AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Madhuri Dixit: आज कोट्यवधींची मालकीण असणारी माधुरी अंधेरीत या खोलीत राहायची, पहिल्यांदाच आला Video

Madhuri Dixit old House: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये माधुरी दीक्षित सर्वात आधी राहात असलेल्या घराची झलक दाखवण्यात आली आहे.

Madhuri Dixit: आज कोट्यवधींची मालकीण असणारी माधुरी अंधेरीत या खोलीत राहायची, पहिल्यांदाच आला Video
Madhuri Dixit old HomeImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Sep 30, 2026 | 12:53 PM
Share

बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित आजही लाखो रसिकांच्या मनात अढळ स्थान राखून आहे. तिच्या अभिनय आणि नृत्याच्या जोरावर तिने सिनेसृष्टीत मोठे यश मिळवले. तिच्याकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे. मात्र, प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचण्यापूर्वी माधुरी दीक्षितचे आयुष्य अगदी सर्वसामान्य होते. मुंबईतील एका छोट्याशा घरात तिने आपले बालपण घालवले होते. हे घर एका जुन्या बिल्डींगमध्ये आहे. तसेच वन बिएचके असलेला हा फ्लॅट अतिशय साधा आहे. कोणतेही मोठे फर्निचर नाही, मोठ्या खिडक्या नाहीत. तुम्ही एकदा हे घर आतुन पाहाच…

लवकरच माधुरी दीक्षित ‘कोण होणार करोडपती’ या लोकप्रिय क्विज शोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शो सुरू होण्यापूर्वी सोनी टीव्हीने एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत माधुरीचे मुंबईतील जुन्या घराचे दर्शन घडवण्यात आले आहे.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

सोनी मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर माधुरी दीक्षितच्या घराचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकजण चकीत झाले आहेत. आज कोट्यवधी रुपयांची मालकीण असेलली माधुरी एकेकाळी जुन्या बिल्डींगमध्ये वन बिएचके प्लॅटमध्ये राहात होती. बालपणी माधुरी अंधेरी येथील जे.बी. नगर येथे राहत होती. ‘योगेंद्रभवन’ नावाच्या इमारतीत त्यांचा फ्लॅट होता. ही इमारत आजही तिथे आहे.

शेजारच्यांनी दाखवली घराची झलक

सुपरस्टार बनल्यानंतर माधुरीचे ग्लॅमरस आयुष्य सर्वांनी पाहिले आहे. पण जे.बी. नगरमधील या जुन्या इमारतीने तिचा बालपणाचा आणि संघर्षाचा काळ जवळून अनुभवला आहे. व्हिडीओमध्ये तिच्या जुन्या शेजाऱ्यांनी आणि सहकाऱ्यांनी त्या आठवणींना उजाळा दिला आहे.

माधुरीचे शेजारी प्रदीप मिश्रा यांनी इमारतीच्या पायऱ्या आणि जुन्या घराची पाहणी करताना सांगितले की, “इथे पूर्वी सोफा असायचा. त्याच ठिकाणी माधुरी आपल्या आई-वडील आणि कुटुंबासोबत वेळ घालवायची. घरातील जुने शोकेस आजही तिथे उभे आहे आणि तिच्या आठवणींची साक्ष देत आहेत.” इमारतीचे छत हे घराचा महत्त्वाचा भाग होता. माधुरी तिथेच सर्वाधिक वेळ घालवायची. आज सुपरस्टार असतानाही माधुरीच्या मुळांशी जोडलेल्या या आठवणी तिच्या साध्या आणि संघर्षमय सुरुवातीची आठवण करून देतात.

Follow Us
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण..
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण...
कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
Donald Trump : AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता Artificial Intelligence नव्हे तर....
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; मुख्यमंत्र्यांना केलं भावनिक आवाहन, म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; राऊतांनी सांगितलं खरं कारण म्हणाले..
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले...
रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
Ratnagiri : रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; गजानन महाराज...
Dry Drought Help : राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; शेगावच्या गजानन महाराज संस्थानकडून तब्बल एवढी मदत जाहीर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर....
Thane : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर, जुन्या वादातून....
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी! संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?