इतकं सुपरहिट गाणं की ऐकताच लोक जागेवरच गुणगुणतात, 2 वर्षात 100 कोटी लोकांनी पाहिलं
2 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील सर्वात सुपरहिट गाणं, ज्याला आतापर्यंत 100 कोटी लोकांनी पाहिलं. आजही कुठे जरी ऐकू आलं तरी लोक ते गाणं दिवसभर गुणगुणतात.

हॉरर-कॉमेडी चित्रपटांमध्ये ‘स्त्री 2’ने प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं. हॉरर आणि कॉमेडीचा अनोखा मेळ साधणाऱ्या या चित्रपटातील गाणीही प्रचंड गाजली. विशेषतः ‘आज की रात’ या गाण्याने यूट्यूबवर 1 बिलियन म्हणजेच 100 कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज मिळवत मोठा टप्पा गाठला आहे असा दावा केला जातो.
तमन्ना भाटियाच्या आकर्षक डान्समुळे आणि मधुबंती बागची यांच्या आवाजामुळे हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं. चित्रपट प्रदर्शित होऊन 2 वर्षे झाली असली तरी या गाण्याची लोकप्रियता कायम असल्याचं पाहायला मिळतं आहे.
सचिन-जिगरचं संगीत आणि मधुबंती बागचींचा आवाज
‘आज की रात’ या गाण्याला सचिन-जिगर यांनी संगीत दिलं आहे. गीतकार अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिलेले बोल आणि मधुबंती बागची यांच्या आवाजाने गाण्याला खास रंगत मिळाली. गझल आणि इलेक्ट्रॉनिक बीट्सचा संगम साधत हे गाणं तयार करण्यात आलं आहे.
गाण्यातील तमन्ना भाटियाचा ग्लॅमरस अंदाज, डान्स आणि संगीत यामुळे ‘आज की रात’ हे पार्टी अँथम म्हणून लोकप्रिय झालं. गायिका मधुबंती बागची यांनी गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी 90च्या दशकातील गायकीच्या शैलीचा अभ्यास केल्याचं सांगितलं जातं.
‘स्त्री 2’ची दमदार स्टारकास्ट
अमर कौशिक यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘स्त्री 2’मध्ये राजकुमार राव, श्रद्धा कपूर, पंकज त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी आणि अपारशक्ती खुराना यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. तमन्ना भाटिया ‘आज की रात’ या गाण्यात विशेष भूमिकेत दिसली आहे.
याशिवाय वरुण धवन आणि अक्षय कुमारचे कॅमिओदेखील चित्रपटात पाहायला मिळतो. 15 ऑगस्ट 2024 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली.
बॉक्स ऑफिसवरही गाजला चित्रपट
‘स्त्री 2’ने भारतात सुमारे 627 कोटी रुपयांची नेट कमाई केल्याचं सांगितलं जातं. तर जगभरात या चित्रपटाने अंदाजे 875 ते 880 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. कमी बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाला मोठं व्यावसायिक यश मिळालं. ‘आज की रात’ गाण्याची लोकप्रियता आणि ‘स्त्री 2’चं बॉक्स ऑफिस यश यामुळे हा चित्रपट आणि त्याचं संगीत आजही चर्चेत आहे.
