आमिर खानला लग्नाशिवाय मूल..; भाऊ फैजलचा खळबळजनक दावा, कोण आहे ती?

आमिर खानचा सख्खा भाऊ फैजल खानने त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ब्रिटिश पत्रकार आणि एक्स गर्लफ्रेंड जेसिकासोबत आमिरला एक मुलगा असल्याचा खळबळजनक दावा त्याने केला आहे. सोमवारी फैजलने पत्रकार परिषद घेतली होती.

आमिर खानला लग्नाशिवाय मूल..; भाऊ फैजलचा खळबळजनक दावा, कोण आहे ती?
आमिर खान, जेसिका आणि तिचा मुलगा जान
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 19, 2025 | 9:14 AM

अभिनेता आमिर खानचा भाऊ फैजल खानने सोमवारी 18 ऑगस्ट रोजी मुंबईत एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्याने आमिर आणि त्याच्या कुटुंबातील इतर सर्व सदस्यांबाबत धक्कादायक दावे केले आहेत. फैजल गेल्या अनेक वर्षांपासून लाइमलाइटपासून दूर होता. त्याने एक पत्र लिहून आमिर आणि कुटुंबीयांसोबत नातं तोडत असल्याचं जाहीर केलं होतं. आता फैजलने भाऊ आमिरवर खळबळजनक आरोप केले आहेत. ब्रिटिश पत्रकार जेसिका हाइन्ससोबत आमिरला एक मुलगा असून त्याचं नाव जान असं आहे, असा दावा फैजलने केला आहे.

फैजल खानने पत्रकार परिषदेत सांगितलं, “मी जेव्हा माझ्या कुटुंबीयांवर नाराज होतो, तेव्हा मी एक पत्र लिहिलं होतं आणि त्यात कुटुंबातील प्रत्येक सदस्याबद्दल सांगितलं होतं की ते कसे आहेत? माझे कुटुंबीय मला सांगत होते की लग्न कर, लग्न कर. आमिरचं रीनासोबतचं लग्न मोडलं होतं. तो जेसिका हाइन्ससोबत रिलेशनशिपमध्ये होता. तिच्यापासून आमिरला एक मुलगासुद्धा आहे. या दोघांनी कधी लग्न केलं नव्हतं. पत्रात मी लिहिलं होतं की, त्यावेळी आमिर हा किरण रावसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्येही होता. माझ्या वडिलांनी दोनदा लग्न केलं होतं. माझ्या चुलत बहिणीनेही दोन वेळा लग्न केलं होतं. त्यामुळे मी त्यांना बोलत होतो की तुम्ही मला का लग्न करण्याचा सल्ला देताय?”

जेसिका आणि तिच्या मुलाचा फोटो

2005 मध्ये ‘स्टारडस्ट’ मासिकात आमिर आणि जेसिकाच्या लिव्ह-इन रिलेशनशिपबाबतचं वृत्त छापण्यात आलं होतं. या रिपोर्टमध्येही दावा करण्यात आला होता की, ब्रिटिश पत्रकार जेसिकासोबत आमिरला एक मुलगा आहे आणि त्याचं नाव जान असं आहे. ‘गुलाम’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान या दोघांची भेट झाली होती. या मासिकाच्या लेखात असाही दावा करण्यात आला होता की जेव्हा जेसिकाला समजलं की ती गरोदर आहे, तेव्हा आमिरने तिची साथ सोडली आणि तिला गर्भपात करण्याचा सल्ला दिला होता. परंतु त्या बाळाला जन्म देण्याबाबत आणि त्याचं संगोपन एकटीने करण्याबाबत जेसिका ठाम होती. म्हणूनच 2000 च्या सुरुवातीला तिने मुलाला जन्म दिला. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या एका वृत्तानुसार, जेसिकाने 2007 मध्ये लंडनमधील बिझनेसमन विलियम टेलबोटशी लग्न केलं होतं.

जेसिकाच्या मुलाचे फोटो दोन वर्षांपूर्वी रेडिटवर व्हायरल झाले होते. हे फोटो पाहून तिचा मुलगा हुबेहूब आमिर खानसारखाच दिसत असल्याच्या प्रतिक्रिया समोर आल्या होत्या. रेडिटच्या युजर्सनी असाही दावा केला होता की आमिरने त्याच्या मुलाचा कधी जाहीररित्या स्वीकार केला नाही, परंतु त्याचे फोटो ब्रिटिश वोग मासिकात छापण्यात आले होते.