AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रशियाने भारताला दिला दगा! कच्च्या तेलाबाबत मोठा निर्णय, दर वाचून…

रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांनी रशियन गॅस कंपन्यांना तेल - गॅसच्या वाढत्या किंमतीचा फायदा उचलण्याचे आदेश दिले होते. या युद्धामुळे रशियाचे तेल खरेदी करण्याची सुट भारतासह अनेक देशांना अमेरिकेने दिली आहे.

रशियाने भारताला दिला दगा! कच्च्या तेलाबाबत मोठा निर्णय, दर वाचून...
pm modi and putin
| Updated on: Mar 16, 2026 | 10:38 PM
Share

इराणवर अमेरिका आणि इस्राईलने हल्ला केल्यानंतर मध्य पूर्वेत इंधनाचे संकट तयार झाले आहे. रशियाने फेब्रुवारी २०२२ मध्ये युक्रेनसोबत युद्ध सुरु झाल्यानंतर पश्चिम प्रतिबंधांमुळे रशियाने भारतास खूप स्वस्तात इंधन विकले होते. भारतीय रिफायनरीने स्वस्तातील रशियन तेलाने बक्कळ नफा कमावला. मात्र, आता जग एकीकडे मोठ्या युद्ध संकटात अडकले असताना भारताला आता रशियाचे महागडे तेल विकत लागत आहे. त्यामुळे भारताला आता २०२२ च्या तुलनेत रशियाकडून महागडे तेल विकत घ्यावे लागत आहे.

ब्लुमबर्गच्या एका रिपोर्टनुसार भारतात येणारे रशियाचे प्रमुख कच्चे तेल युराल क्रुडची किंमत रेकॉर्ड स्तरावर पोहचली आहे. रशियातील तेलाच्या किंमतीत मोठी उसळी आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला रशियाकडून तेल विकत घेण्याची सूट दिली असून संपूर्ण जगातील देशांना त्यांनी अशा प्रकारची सुट दिलेली आहे. भारतात येणाऱ्या रशियन तेल युरालची किंमत शुक्रवारी ९८.९३ डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहचली आहे. ऊर्जा डेटा फर्म Argus Media नुसार यात शिपिंग चार्जेसचा देखील समावेश आहे. भारताला याच्या आधी रशियाकडून इतके महाग दराने तेल खरेदी करावे लागले नाही.

भारतासाठी रेकॉर्ड महाग इंधन –

रशियाच्या तेलाची किंमती अशा वेळी वाढल्या आहेत जेव्हा मध्य-पूर्वेतील पेटलेल्या युद्धामुळे जागतिक तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. आकड्यानुसार भारतीय पोर्टवर पोहचणाऱ्या रशियन कच्च्या तेलातून मिळणारी सुट शुक्रवारी वैश्विक बेंचमार्क ब्रेंच क्रुडच्या तुलनेत घटून ४.८० डॉलर प्रति बॅरल झाली आहे.

२८ फेब्रुवारी रोजी इराण सोबत युद्ध सुरु झाल्यानंतर तेलाच्या वाढत्या किंमतींना पाहून अमेरिकेने सर्वात आधी भारताने रशियाच्या तेल खरेदीने सूट जारी केली होती. ही अस्थायी सूट असून जी ३० दिवसांसाठी जारी केली आहे. यानंतर गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने दुसऱ्यांदा अनुमती दिली आहे. ज्या अंतर्गत जगातील सर्व देश समद्रात आधीच उपस्थित असलेल्या रशियन तेल कार्गो खरेदी करु शकतात.

अमेरिकेने हा निर्णय यासाठी घेतला आहे कारण डोनाल्ड ट्रम्प प्रशासन तेलाच्या किंमतीवर प्रेशर घटवण्याचा प्रयत्न करीत आहे. मार्च सुरुवातीला अमेरिकेकडून हिरवा झेंडा मिळाल्यानंतर भारतीय रिफायनरींनी ( इंडियन ऑईल आणि रिलायन्स इंडस्ट्रीज ) समुद्रात पडून असलेले ३ कोटी बॅरल न विकलेले रशियन कच्चे तेल खरेदी केले आहे. या सौद्याशी संबंधित लोकांनी गेल्या आठवड्यात ही माहिती दिली.

भारताला महाग तेल विकून किती कमवतोय रशिया ?

Argus Media च्या मते शुक्रवारी रशियाच्या पश्चिम पोर्टमधून युराल क्रुडची सरासरी किंमत ७३.७३ डॉलर प्रति बॅरल होती. जी जुलै २०२४ नंतर सर्वात जास्त आहे. मात्र निर्यात किंमत आणि डिलिव्हरी किंमत दरम्यान अंतर किती हे स्पष्ट झालेले नाही. ज्यास डिलिव्हरी स्प्रेड म्हटले जाते. शेवटी रशियाला किती फायदा पोहचतो हे स्पष्ट झालेले नाही.

मात्र, तरीही रशियाच्या या वर्षांच्या अंदाजित सरासरी ५९ डॉलर प्रति बॅरलहून खूप जास्त आहे. गेल्या आठवड्यात रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांनी देशाच्या गॅस कंपन्यांना तेल – गॅसच्या वाढत्या किंमतीचा फायदा उचलण्याचे आदेश दिले होते. मात्र, हा इशाराही पुतीन यांनी दिला होता की ही उसळी अस्थायी असून सरकार आणि कंपन्यांना त्या दृष्टीने प्लानिंग करण्याचे आदेश दिले होते.

Follow Us
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली