AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

6000 टक्के अधिक नफा कमावणारा चित्रपट, बजेट फक्त 15 कोटी, चित्रपटाची कथा ठरलेली प्रचंड सुपरहिट

15 कोटीच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने जगभरात केलेली 965 कोटींची कमाई. बॉक्स ऑफिसवर 6000 टक्के अधिक कमावलेला नफा. 16 वर्षांच्या अभिनेत्रीच्या भूमिकेमुळे चित्रपट ठरलेला ब्लॉकबस्टर.

6000 टक्के अधिक नफा कमावणारा चित्रपट, बजेट फक्त 15 कोटी, चित्रपटाची कथा ठरलेली प्रचंड सुपरहिट
Image Credit source: Social media
| Updated on: Oct 18, 2026 | 6:10 PM
Share

एखादा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी होण्यासाठी मोठे सुपरस्टार, भरमसाठ बजेट आणि भव्य सेटची गरज असतेच असे नाही. दमदार कथा आणि भावनिक विषयाच्या जोरावरही चित्रपट प्रेक्षकांची मने जिंकू शकतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे 2017 मध्ये प्रदर्शित झालेला आमिर खान प्रॉडक्शन्सचा ‘सीक्रेट सुपरस्टार’. अवघ्या 15 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जगभरात सुमारे 965 कोटी रुपयांची कमाई केल्याचे वृत्त आहे. विशेषतः चीनमधील प्रचंड प्रतिसादामुळे चित्रपटाच्या कमाईत मोठी भर पडली.

अद्वैत चंदन दिग्दर्शित हा संगीतमय चित्रपट गुजरातमधील वडोदरा येथे राहणाऱ्या इन्शिया मलिक या 15 वर्षीय मुलीची कथा सांगतो. झायरा वसीमने इन्शियाची भूमिका साकारली आहे. तिला गायिका व्हायचे असते; मात्र तिचे वडील फारुख हे तिच्या स्वप्नांच्या विरोधात असतात. घरातील कठोर वातावरण आणि वडिलांच्या दबावामुळे तिला आपल्या इच्छेनुसार जगणे कठीण जाते.

इन्शियाची आई नजमा मात्र मुलीच्या स्वप्नांना साथ देते. ती गुपचूप मुलीसाठी लॅपटॉप विकत घेते. त्यानंतर इन्शिया चेहरा झाकून यूट्यूबवर गाणी अपलोड करण्यास सुरुवात करते. ‘सीक्रेट सुपरस्टार’ या नावाने सुरू केलेल्या तिच्या चॅनेलवरील गाणे व्हायरल होते आणि ती रातोरात प्रसिद्ध होते.

तिच्या आवाजाने प्रभावित झालेला मुंबईतील संगीत दिग्दर्शक शक्ती कुमार तिच्या प्रतिभेला ओळखतो आणि तिला पुढे जाण्यास मदत करतो. आमिर खानने शक्ती कुमारची भूमिका साकारली आहे.

आई-मुलीच्या नात्याची भावनिक कहाणी

‘सीक्रेट सुपरस्टार’ हा केवळ एका मुलीच्या गायिका होण्याच्या स्वप्नाचा चित्रपट नाही. कौटुंबिक हिंसाचार, महिलांचे स्वातंत्र्य, आई-मुलीमधील प्रेम आणि स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी केलेला संघर्ष असे अनेक महत्त्वाचे विषय यात मांडण्यात आले आहेत.

झायरा वसीमच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले. मेहर विजने इन्शियाच्या आईची भूमिका साकारली तर राज अर्जुनने तिच्या वडिलांची भूमिका केली. मेहर विजला या भूमिकेसाठी फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला.

चीनमध्ये मिळाला मोठा प्रतिसाद

सुमारे 15 कोटी रुपयांच्या बजेटच्या तुलनेत चित्रपटाने जगभरात सुमारे 965 कोटी रुपयांची कमाई केल्याचे सांगितले जाते. चीनमधील प्रदर्शनामुळे या चित्रपटाला प्रचंड आर्थिक यश मिळाले. कमी बजेटमध्ये तयार झालेल्या भारतीय चित्रपटांसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला.

Follow Us
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना...
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना उधाण
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड सहभागी,
मोठी बातमी! स्मिता जाधवांना पाठिंबा देण्यावर शंभूराज देसाईंची मोठी अट,
मोठी बातमी! स्मिता जाधवांना पाठिंबा देण्यावर शंभूराज देसाईंची मोठी अट, महायुतीत धुसफूस कायम
राज ठाकरेंच्या शिवतीर्थवर आमिर खानची अचानक एन्ट्री; शिवतीर्थवर नेमकं..
Aamir Khan Meet Raj Thackeray : राज ठाकरेंच्या शिवतीर्थवर आमिर खानची अचानक एन्ट्री; शिवतीर्थवर नेमकं काय घडतंय? कारण अद्याप गुलदस्त्यात
पत्रकार असल्याचा धाक दाखवून खंडणीचा डाव; थेट बार मालकाकडे...
Mumbai : पत्रकार असल्याचा धाक दाखवून खंडणीचा डाव; थेट बार मालकाकडे...
स्वतःचे आमदार सांभाळू शकले नाहीत...; उद्धव ठाकरेंवर फडणवीसांचा निशाणा
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray; स्वतःचे आमदार सांभाळू शकले नाहीत...; उद्धव ठाकरेंवर देवेंद्र फडणवीसांचा थेट निशाणा
मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांची मोहन भागवतांशी भेट; चर्चांना उधाण
मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांची मोहन भागवतांशी भेट; चर्चांना उधाण
कोल्हापुरात गोकुळ दूधसंघ निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार
Gokul Milk Union Election 2026 : कोल्हापुरात गोकुळ दूधसंघ निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार
उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षातील रेजिम चेंजकडे लक्ष द्यावं...
Navnath Ban : उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षातील रेजिम चेंजकडे लक्ष द्यावं; नवनाथ बन यांचा ठाकरे-राऊतांवर निशाणा