Matka King : नागराज मंजुळेच्या ‘मटका किंग’ वेब सीरीजबद्दल ऐकल्यानंतर आमिर खानला रहावलं नाही, लगेच मनातलं बोलला

Matka King : सध्या सोशल मीडियावर नागराज मंजुळे यांच्या मटका किंग वेब सीरीजची चर्चा आहे. रतन खत्री यांच्या आयुष्यावर आधारित ही वेब सीरीज अनेकांना आवडतेय. आता बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान या वेब सीरीजवर व्यक्त झाला आहे.

Matka King : नागराज मंजुळेच्या मटका किंग वेब सीरीजबद्दल ऐकल्यानंतर आमिर खानला रहावलं नाही, लगेच मनातलं बोलला
Vijay Varma-Aamir Khan
| Updated on: Apr 22, 2026 | 7:24 AM

सध्या OTT विश्वात मागच्याच आठवड्यात रिलीज झालेल्या नागराज मंजुळे यांच्या ‘मटका किंग’ वेब सीरीजची चर्चा आहे. प्राइम व्हिडिओवर ही आठ भागांची वेब सीरीज रिलीज झाली आहे. रतन खत्रीच्या आयुष्यावर ही वेब सीरीज बेतली असल्याचं बोललं जात आहे. यात बॉलिवूड स्टार विजय वर्माने रतन खत्रींची भूमिका साकारली आहे. यात विजय वर्मा याच्या कॅरेक्टरच ब्रीज भट्टी हे नाव आहे. विजय वर्माने ब्रीज भट्टीचा रोल उत्तमरित्या साकारला आहे. रमेश तौरानी, विकी कौशल आणि करण जोहर सारख्या बॉलिवूडमधल्या मोठ्या नावांनी या वेब सीरीजचं कौतुक केलं आहे. यात आता परफेक्शनिस्ट आमिर खानची भर पडली आहे. त्याने सोशल मीडियावर या वेब सीरीजचं कौतुक करताना मला रतन खत्रीचा रोल साकारायला आवडला असता असं म्हटलं आहे.

आमिर खानने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये ‘मटका किंग’ वेब सीरीजच पोस्टर शेअर केला आहे. मला रतन खत्रीचा रोल प्ले करायला आवडला असता असं आमिरने लिहिलय. त्याने नागराज, विजय, सिद आणि सगळ्या मटका किंग टीमचं कौतुक केलं आहे. “रतन खत्रीच कॅरेक्टर मला प्ले करायला आवडलं असतं. नक्कीच यात विजयने जबरदस्त भूमिका केली असेल. ‘एक दीन’ रिलीज झाल्यानंतर लवकरच मी ही वेब सीरीज पाहेन. या वेब सीरीजबद्दल चांगल्या गोष्टी ऐकतोय. पुन्हा एकदा अभिनंदन” असं आमिरने त्याच्या मेसेजमध्ये लिहिलय.

नागराज मंजुळेने ठसा उमटवला

“नुकतीच ही वेब सीरीज पाहून संपवली. विजय वर्मा तू उत्तम कलाकार आहेस. नागराज मंजुळेच अभिनंदन” असं निर्माते रमेश तौरानी यांनी म्हटलं आहे. विकी कौशलने अजून ही वेब सीरीज पाहिलेली नाही. पण त्याच्या वॉचलिस्टमध्ये आहे. ‘माझा फेवरेट डायरेक्टर. माझ्या वॉचलिस्टमध्ये पुढची वेब सीरीज’ असं विकी कौशलने म्हटलय. ही वेब सीरीज आपल्याला 70-80 च्या दशकात घेऊन जाते. तो काळ ज्यांनी पाहिलाय, त्यांच्यासमोर जुनी मुंबई उभी राहिलं. दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळेने या वेब सीरीजमधून ठसा उमटवला आहे. त्याने मुख्य कलाकार विजय वर्मासह अन्य कलाकारांकडून उत्तम अभिनय वठवून घेतला आहे. त्यामुळे ही वेब सीरीज उजवी ठरते.

Follow Us