लाइमलाइटपासून दूर राहणारा अक्षय कुमारचा मुलगा दिसला ‘या’ अभिनेत्रीसोबत ! आरवचा फोटो व्हायरल होताच चर्चांना उधाण
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेने एक खास फोटो शेअर केला. सुट्ट्यांमधील हा बेकिंगचा क्षण सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला असून, तिच्यासोबतच्या व्यक्तीला पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. लाइमलाइटपासून दूर राहणाऱ्या आरवमुळे या फोटोची अधिक चर्चा झाली. नेटकऱ्यांनी यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सध्या तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आहे. तिने नुकतीच तिच्या सुट्ट्यांची झलक शेअर केली, मात्र त्यातील एक फोटोने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं, अन् कित्येकांच्या भुवया उंचावल्या. कारण एका फोटोमध्ये अनन्या चक्क, अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री ट्विंकल खन्ना यांचा मुलगा, आरव याच्यसोबत दिसली. दोघांचाही हा फोटो समोर येताच व्हायरल झाला आणि सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं. विशेष म्हणजे, आरव भाटिया हा बहुतांश वेळा लाइमलाइटपासून दूर असतो, मीडियाच्याही फार नजरेत येणं तो टाळतो. अशातच अनन्या पांडेसोबतचा त्याच्या फोटोने अनेकांचं लक्ष वेधलं गेलं.
अनन्याने आरवबोसत शेअर केला फोटो
अनन्या पांडेने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर आरवसोबतचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये दोघेही एकत्र बसलेले असून त्यांच्या चेहऱ्यावर गोड हसू दिसलं. त्यांच्या हातात बेक केलेले छोटे-छोटे पदार्थ असून, त्यांनी एकत्र बेकिंगचा आनंद घेतल्याचे या फोटोवरून दिसतं. ‘मित्रांनो, माझ्या बेकिंगला मंजुरी मिळाली आहे!’ अशी मजेशीर कॅप्शन या फोटोसह अनन्याने लिहिली होती. तिच्या या फोटोमुळे दोघांमधील हा खास क्षण चर्चेत आला आहे. मात्र, सध्या सुट्ट्यांसाठी ते दोघं नेमकं कुठे गेले आहेत, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
फोटोत दिसला खास लूक
या फोटोमध्ये आरवने राखाडी रंगाचा पॅटर्न असलेलं निट कार्डिगन आणि गडद रंगाचा शर्ट परिधान केला होता. तो कॅमेऱ्याकडे पाहून हसताना दिसला, त्याच्या हातात मफिन्स ठेवलेला डबाही होता. तर त्याच्याशेजारी बसलेल्या अनन्याने गडद तपकिरी रंगाची ओव्हरसाइज्ड झिप-अप हुडी घातली होती. दोघांच्याही साध्या आणि आरामदायी लूकने या फोटोला खास बनवलं. आरव भाटिया सहसा सार्वजनिक ठिकाणी फारसा दिसत नसल्याने त्याचा हा फोटो खास ठरला आहे.

( Photo Credit : Social Media)
रेडिटवर व्हायरल झाले फोटो
अनन्या आणि आरवचा हा फोटो रेडिटवरही चर्चेत आला आहे. फोटो पाहिल्यानंतर काही नेटकऱ्यांनी आरवच्या लूकवर प्रतिक्रिया दिल्या, तर काहींनी सोशल मीडियावर होणाऱ्या टीकेबद्दल सहानुभूती व्यक्त केली. एका युजरने आरवच्या आकर्षक दिसण्याबद्दल आपले मत मांडलं. आरवचा लूक परफेक्ट असल्याचं त्याने नमूद केलं. तर दुसऱ्या एका युजरने आरवची बाजू घेतली. तो अभिनय क्षेत्राशी संबंधित नसतानाही सोशल मीडियावर त्याच्याबद्दल नकारात्मक टिप्पणी केली जाते, असं त्याने म्हटलं. दरम्यान, आणखी एका युजरने आरवचा लूक एआयच्या मदतीने तयार केलेल्या फोटोसारखा वाटत असल्याची कमेंट केली. एकंदरच या फोटोवर नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या.
लाइमलाइटपासून असतो दूर आरव भाटिया
अभिनेता अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांचा मोठा मुलगा असलेल्या आरवचा जन्म 15 सप्टेंबर 2002 साली झाला. त्याला एक लहान बहीणही आहे, तिचं नाव नितारा असून 2012 साली तिचा जन्म झाला. आपल्या आई-वडिलांच्या पावलावर पाऊल न ठेवता, आरव अद्याप फिल्म इंडस्ट्रीपासून दूर आहे. तसेच मीडियापासूनही तो 2 हात लांब राहतो. मात्र आता अनन्या पांडेसोबतचा हा फोटो समोर आल्याने आरव पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
