AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lalbaugcha Raja 2025 : कर्मही 5G नेटवर्कवर..; लालबागचा राजा मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या पतीचा सणसणीत टोला

Lalbaugcha Raja 2025 : मेहुलच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'खरंय, ज्याला फर्त मूर्ती समजून त्याचा व्यवसाय मांडला, त्यानेच स्वत:चं सत्व दाखवून दिलं', असं एकाने लिहिलं. तर 'हे दु:खद पण सत्य आहे. राजा आता तूच कर काहीतरी', असं अभिज्ञाने म्हटलंय.

Lalbaugcha Raja 2025 : कर्मही 5G नेटवर्कवर..; लालबागचा राजा मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या पतीचा सणसणीत टोला
लालबागचा राजाImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 10, 2025 | 8:33 AM
Share

Lalbaugcha Raja 2025 : यंदा लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाची मिरवणूक कित्येक तास गिरगाव चौपाटीवरच रखडली होती. समुद्राला आलेल्या भरतीमुळे गणेशमूर्ती अत्याधुनिक तराफ्यावर चढविताना अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे तब्बल 33 तासांनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यात आलं. राजाची विसर्जन मिरवणूक रविवारी सकाळी साडेसात वाजता गिरगाव चौपाटीवर दाखल झाली होती. मात्र भरतीमुळे अत्याधुनिक तराफा तरंगत राहिला आणि लालबागच्या राजाची ट्रॉली पाण्याखाली राहिली. त्यामुळे लालबागच्या राजाची मूर्ती ट्रॉलीवरून अत्याधुनिक तराफ्यावर चढवताना अडचणी निर्माण झाल्या होत्या. चौपाटीवर कित्येक तास राजाची मूर्ती पाण्यातच उभी होती आणि तिथेच अनेक भाविकांनी मनसोक्त दर्शन घेतलं. या संपूर्ण घटनेवरून सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अभिनेत्री अभिज्ञा भावेचा पती मेहुल पै यानं लिहिलेली पोस्ट विशेष चर्चेत आली आहे.

मेहुलची पोस्ट-

लालबागचा राजा, मंडळ आणि विसर्जनाची एकंदर अपयशता. इतकं मोठं मंडळ, हातात अफाट पैसा.. एका बाजूला व्हीआयपी लोकांना प्राधान्य देऊन विशेष दर्शनाची सोय, आणि दुसऱ्या बाजूला सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण आणि अपमान- हेच त्या मंडळाचं खऱ्या चेहऱ्यावरचं आरसपानी प्रतिबिंब दिसलं. इतकंच नाही, तर कोळी बांधवांना दर्शन नाकारून त्यांचा अपमानही करण्यात आला. पण राजा तो राजा असतो, आणि तो सर्वांचा असतो. अनंद चतुर्दशीला हे अगदी स्पष्ट झालं. जेव्हा राजा अधांतरी पाण्यात विसर्जनासाठी उभा होता, तेव्हा त्याच्या शेजारी त्याच्या मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते नव्हते, तर कोळी बांधव तब्बल 12 तास त्याच्यासोबत खंबीरपणे उभे होते,’ असं त्याने लिहिलं.

View this post on Instagram

A post shared by Meihul R Paii (@mehul_pai)

याविषयी तो पुढे म्हणाला, ‘शेवटी रात्री 10 वाजता कोळी बांधवांच्या मदतीनेच विसर्जनाची प्रक्रिया पूर्ण झाली आणि राजा आपल्या गावी परत गेला. मात्र जे दृश्य डोळ्यांना दिसलं, राजा पाण्यात पाठ फिरवून उभा असताना – ते मनाला पिळवटून टाकणारं, अतिशय वेदनादायी होतं. आता तरी या मंडळाने समजून घ्यायला हवं की भेदभाव हा भक्तीचा भाग नसतो.’

यातून धडा काय घ्यायचा, हेसुद्धा मेहुलने सांगितलं आहे. ‘आज कर्मही 5G नेटवर्कवर आहे, त्यामुळे कर्माची फळं लगेच परत मिळतात. लालबागच्या राजाचा विजय असो,’ अशा शब्दांत त्याने भावना व्यक्त केल्या आहेत. राजा अर्ध्यापर्यंतच्या पाण्यात उभा होता, पण मंडळ त्यांच्या अहंकारात पूर्णपणे बुडालं होतं, असं कॅप्शन देत त्याने ही पोस्ट शेअर केली आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...