लालबागचा राजा
लालबागचा राजा मुंबईतील सर्वात लोकप्रिय गणपती आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून चिंचपोकळीत गणपती बसवला जातो. या मंडळाची स्थापना 1934 मध्ये कोळी बांधवांनी चिंचपोकळीत केली होती. दरवर्षी दहा दिवसात लाखो भाविक लालबागच्या राजाचं दर्शन घेतात. दिवसाच नव्हे तर रात्रभर दर्शनाच्या रांगा असतात. तर मंडळाकडून वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. सर्वसामान्य नागरिकांपासून ते सेलिब्रिटी, उद्योजकांसह राजकारणीही लालबागच्या राजाच्या दर्शनाला आवर्जुन येतात.
Lalbaugcha Raja 2025 : कर्मही 5G नेटवर्कवर..; लालबागचा राजा मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या पतीचा सणसणीत टोला
Lalbaugcha Raja 2025 : मेहुलच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'खरंय, ज्याला फर्त मूर्ती समजून त्याचा व्यवसाय मांडला, त्यानेच स्वत:चं सत्व दाखवून दिलं', असं एकाने लिहिलं. तर 'हे दु:खद पण सत्य आहे. राजा आता तूच कर काहीतरी', असं अभिज्ञाने म्हटलंय.
- स्वाती वेमूल
- Updated on: Sep 10, 2025
- 8:33 am
मंडळाच्या कार्यकर्त्यांना माज चढलाय…; लालबाग राजाच्या विसर्जनानंतर कोणी पाठवलं CMला पत्र
जवळपास 33 तासांनंतर लालबागच्या राजाचे विसर्जन पार पडले. या विसर्जनाला समुद्रातील भरतीमुळे ८ तासांचा विलंब झाला. लाखो भाविकांनी भक्तीभावाने निरोप दिला. आधुनिक तराफ्याचा वापर करून विसर्जन करण्यात आले. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांकडे ईमेलद्वारे तक्रार करण्यात आली आहे.
- आरती बोराडे
- Updated on: Sep 8, 2025
- 4:44 pm
लालबागच्या राजाच्या ट्रॉलीवर माजी मुख्यमंत्र्यांचा नातूही होता उपस्थित, म्हणाला ‘विघ्नहर्त्याला..’
राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू शिखर पहाडियासुद्धा लालबागचा राजाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाला होता. अनंत अंबानी यांच्यासोबत त्याला पाहिलं गेलं. विसर्जन मिरवणुकीचे फोटो पोस्ट करत त्याने भावना व्यक्त केल्या आहेत.
- स्वाती वेमूल
- Updated on: Sep 8, 2025
- 1:12 pm
Lalbaugcha Raja Visarjan 2025 : 33 तासांनंतर लालबागचा राजाचं विसर्जन, गुजरातच्या तराफ्यावरून मराठी अभिनेत्रीचा टोला
तब्बल 33 तासांनंतर लालबागचा राजाचं विसर्जन पार पडलं. रविवारी गिरगाव चौपाटीवरच हे विसर्जन जवळपास 13 ते 14 तास रखडलं होतं. अनेक प्रयत्नांनंतरही गुजरातवरून आणलेल्या अत्याधुनिक तराफ्यावर मूर्ती चढवण्यास अडचण येत होती.
- स्वाती वेमूल
- Updated on: Sep 8, 2025
- 11:36 am
लालबागचा राजाला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर लोटला लाखोंचा जनसागर
लालबागचा राजाला निरोप देण्यासाठी मुंबईतील गिरगाव चौपाटीवर गणेशभक्तांची प्रचंड गर्दी केली आहे. तब्बल 22 तासांनंतर लालबागचा राजा चौपाटीवर पोहोचला आहे. सकाळी साडेसातच्या सुमारास विसर्जन मिरवणूक गिरगाव चौपाटीवर पोहोचली.
- स्वाती वेमूल
- Updated on: Sep 7, 2025
- 10:34 am
लालबागचा राजाच्या दर्शनासाठी गेलेल्या अभिनेत्रींची गर्दीत झाली अशी अवस्था; Video समोर
अभिनेत्री प्रियांका चहर चौधरी आणि प्रज्ञा जैस्वाल नुकत्याच लालबागचा राजाच्या दर्शनासाठी पोहोचल्या होत्या. यावेळी त्यांना व्हीआयपी रांगेतही बऱ्याच गर्दीचा सामना करावा लागला होता. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
- स्वाती वेमूल
- Updated on: Sep 4, 2025
- 11:07 am
‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी पोहोचली जान्हवी कपूर, पण त्या गर्दीत..
अभिनेत्री जान्हवी कपूरचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. 'लालबागचा राजा'च्या दर्शनासाठी ती अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत पोहोचली होती. परंतु तिथली गर्दी पाहून ती काहीशी घाबरली होती. तिच्या चेहऱ्यावर भीतीचे भाव स्पष्ट दिसत होते.
- स्वाती वेमूल
- Updated on: Aug 29, 2025
- 11:45 am