श्वेता बच्चन हिने भाऊ अभिषेकचे मोठे गुपित केले उघड, थेट म्हणाली, हा ऐश्वर्या रायला…

बिग बी यांचा लेक अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय हे मागील काही दिवसांपासून त्यांच्या खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत होते. त्यामध्येच बहीण श्वेता बच्चन आणि अभिषेक बच्चन यांचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. यावेळी भाऊ अभिषेकबद्दल तिने मोठे विधान केले.

श्वेता बच्चन हिने भाऊ अभिषेकचे मोठे गुपित केले उघड, थेट म्हणाली, हा ऐश्वर्या रायला...
Abhishek Bachchan and Aishwarya Rai
| Edited By: | Updated on: Jul 27, 2025 | 11:41 AM

मुंबई : मागील काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन हा त्याच्या खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे. मध्यंंतरी ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचा घटस्फोट झाला, असे काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आले. मात्र, यावर बच्चन कुटुंबियांकडून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यात आली नाही आणि त्यानंतर अनेकदा अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय एकत्र दिसले. यामुळे दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा अफवा असल्याचे बोलले जाते.

बहीण श्वेता बच्चन हिने केली भाऊ अभिषेकची पोलखोल 

अभिषेक बच्चन हा बहीण श्वेता बच्चन हिच्यासोबत एका शोमध्ये पोहोचला होता. यादरम्यान त्याने आपल्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला. मात्र, बहीण श्वेता हिने अभिषेकची पोलखोल केली आणि अभिषेकने तिला शांत बसण्यास सांगितले. अभिषेक बच्चन आणि श्वेता बच्चन हे करण जोहर याच्या शोमध्ये काही दिवसांपूर्वी पोहोचले होते.

करण जोहरने विचारला अभिषेकला मोठा प्रश्न 

यावेळी करण जोहर याने अभिषेक बच्चनला विचारले की, तू आई जया बच्चन यांना की, पत्नी ऐश्वर्या राय हिला जास्त घाबरतो…यावर अभिषेकने लगेचच उत्तर देत आईचे नाव घेतले. मात्र, श्वेता बच्चन याने अभिषेकचे उत्तर खोडत म्हटले की, पत्नी ऐश्वर्याला जास्त घाबरतो…यावर अभिषेक म्हणाला, मला विचारले आहे ना…मग तू शांत बस…

अभिषेकचा श्वेता बच्चनला शांत राहण्याचा सल्ला 

एकप्रकारे अभिषेक बच्चन याची पोलखोल करताना श्वेता बच्चन ही दिसली आहे. जया बच्चन या त्यांच्या कडक स्वभावासाठी ओळखल्या जातात. त्यांचे अनेक व्हिडीओही सोशल मीडियावर कायमच व्हायरल होताना दिसतात. त्यामध्येच करणच्या शोमध्ये आपण आई जया बच्चनला घाबरतो, असे अभिषेक बच्चन याने म्हटले आहे.

बिग बींचा लेक कोणाला घाबरतो?…

ऐश्वर्या राय ही काही दिवसांपूर्वी मुलगी आराध्या बच्चन हिच्यासोबत विदेशात जाताना दिसली होती. यावेळी चाहत्यांनी ऐश्वर्याला अभिषेक कुठे आहे, विचारले. ऐश्वर्या नेहमीच मुलगी आराध्या हिच्यासोबत फिरताना दिसते. आराध्याच्या स्कूलमधील एका प्रोग्रामला अख्ख्ये बच्चन कुटुंबिय पोहोचले होते.