टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट; आरोपींच्या टार्गेटवर अभिनेता नव्हताच, पण ‘या’मुळे ऐनवेळी….
मुंबईमध्ये अभिनेता टायगर श्रॉफला संपवण्यासाठी आलेल्या आरोपींनी प्राथमिक तपासात खळबळजनक खुलासा केला आहे. मुख्य निशाणा हा टायगर नव्हता तर दुसराच... नेमकं काय घडलं?

कृष्णा सोनारवाडकर, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. आरोपींच्या प्राथमिक चौकशीत मोठा खुलासा झाला आहे. हल्लेखोरांच्या टार्गेटवर आधी टायगर श्रॉफ नव्हताच. आरोपी मुंबईत एका मोठ्या व्यक्तीला मारण्यासाठी आले होते, आरोपींच्या प्राथमिक चौकशीत खुलासा करण्यात आला आहे. आरोपीनी आधी ठरवलेल्या टार्गेटपर्यंत सहज पोहोचता न आल्याने टायगर श्रॉफवर हल्ला करण्यात आला, असा खळबळजनक खुलासा समोर आला आहे. टायगर श्रॉफसोबत पोलीस बंदोबस्त नसतो हे त्याच्या चाहत्यांच्या रील्सवरून कळल्याने त्याला लक्ष्य करण्यात आले, असे आरोपींनी सांगितले आहे.
बॉलिवूडमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी टायगर श्रॉफ याला थेट जीवे मारायचे ठरवले असल्याचा मोठा खुलासा यावेळी आरोपीकडून करण्यात आला आहे. टायगर श्रॉफ आणि त्याच्या चाहत्यांच्या इंस्टाग्रामवरुण हल्लेखोरांनी रेकी करत टायगर श्रॉफच्या मुव्हमेंट ट्रेस केल्या त्यानंतर हा हल्ला करण्ययात आला.
नेमकं काय घडलं?
अभिनेता टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणामध्ये सध्या तीन आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत. त्यांना मुंबईमध्ये आणलं जात आहे. पण रात्रभर मुंबई पोलिसांच्या तीन पथकांनी त्यांची चौकशी केली आहे. याच प्राथमिक चौकशीमध्ये हा मोठा खुलासा आरोपींनी केला आहे. त्यांना मुंबईत दाखल होण्यापूर्वी वेगळ्या व्यक्तीला लक्ष्य करायचं होतं. सगळा प्लॅन तयार होता, पण मुंबईत दाखल झाल्यानंतर त्यांना टार्गेटपर्यंत पोहोचणं अश्यक्य वाटायला लागलं होतं. त्यानंतर त्यांनी बॉलिवूडध्ये दहशत निर्माण करण्यासाठी अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर हल्ला करण्याचं ठरवलं.
दरम्यान, यावेळी त्यांनी अभिनेत्याचा सर्व तपशील हा ऑनलाइन सोशल मीडियावरील घडामोडींवरुन काढला. त्यानंतर त्यांना पुष्पापार्कमध्ये अभिनेता असल्याची माहिती मिळाली. नंतर समोरील सर्व प्रकार घडला. याप्रकरणी लॉरेन्स बिश्नोई गँगनेही जबाबदारी स्वीकारल्याची माहिती समोर आली होती. पण आता ती व्यक्ती कोण होती, ज्या व्यक्तीला संपवण्यासाठी तिघे आरोपी मुंबईत दाखल झाले होते. पोलिस चौकशीत याचा खुलासा कधी होणार याकडे सध्या लक्ष लागलं आहे.
