AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhamendra Death : धर्मेंद्र यांचा लकी शर्ट, 3 फिल्म्समध्ये घालून केला रोमान्स, तिन्ही सुपरहिट, हा किस्सा माहीत आहे का ?

Dharmendra Shirt : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचं आज निधन झालं. विलेप्राले येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. धर्मेंद्र यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकहाून एक हिट चित्रपट दिले. मात्र एक शर्ट त्यांच्यासाठी खूप लकी होती. तोच शर्ट घालून त्यांनी तीन चित्रपटांमध्ये रोमान्स केला. जाणून घेऊया कहाणी,

Dhamendra Death : धर्मेंद्र यांचा लकी शर्ट, 3 फिल्म्समध्ये घालून केला रोमान्स, तिन्ही सुपरहिट, हा किस्सा माहीत आहे का ?
धर्मेंद्र यांचा लकी शर्ट
| Updated on: Nov 24, 2025 | 3:38 PM
Share

गेल्या अनेक दिवसांपासून आजारी असलेले ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dhamendra) यांचे आज सकाळी निधन झालं.गेल्या आठवड्यात रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यावर त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते, तेथेच त्यांनी वयाच्या 89 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात 2 पत्नी, मुलं, नातवडं असा मोठा परिवार आहे. गेली अनेक वर्ष चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या धर्मेंद्र यांनी बॉलिवूडमधील एकाहून एक सुंदर अभिनेत्रींसोबत काम केलं, त्यांच्याशी मोठ्या पडद्यावर रोमान्स केला.

धर्मेंद्र यांची कारकीर्द

तसं तर त्यांनी विविध रोमँटिक चित्रपटात सर्वोत्तम काम केलं. त्यात त्यांनी अनेक सुंदर कपडेही घातले. पण पिवळ्या रंगाचा शर्ट त्यांच्यासाठी विशेष महत्त्वाचा होता, जो त्यांनी तीन चित्रपटांमध्ये परिधान केला होता. तो शर्ट धर्मेंद्र यांच्यासाठी खूप लकी होता. 70 आणि 80 चे दशक हे बॉलिवूडचा सुवर्णकाळ मानला जातं. त्या काळात असे अनेक चित्रपट बनले जे कधीही विसरता येणार नाहीत. धर्मेंद्र हे त्या काळातील सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक होते. त्यांना बॉलीवूडचा ही-मॅन म्हणून ओळखले जात असे. त्यांच्या रोमँटिक तसेच अ‍ॅक्शन भूमिकांसाठी ते चित्रपट निर्मात्यांचे आवडते होते.

धर्मेंद्र यांनी 1960 मध्ये ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटाद्वारे पदार्पण केले. त्यांचा पहिला चित्रपट फ्लॉप ठरला, पण धर्मेंद्र यांनी हिंमत गमावली नाही. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर त्यांनी फुल और पत्थर या चित्रपटातून सर्वांना प्रभावित केले. त्यानंतर धर्मेंद्र यांनी शोले, आँखे आणि कर्तव्य यासारख्या चित्रपटांमध्ये काम करून स्वतःचं नाव प्रस्थापित केलं. काही चित्रपटांमध्ये त्यांनी एक शर्ट घातला जो त्यांच्यासाठी खूप भाग्यवान ठरला.

हा ठरला लकी शर्ट

धर्मेंद्र यांनी 1968 ते 1970 दरम्यान तीन प्रमुख चित्रपटांमध्ये काम केले, ते चित्रपट म्हणजे, मेरे हमदम मेरे दोस्त, आया सावन झुमकर आणि जीवन मृत्यु. या तिन्ही चित्रपटांमध्ये एक समान धागा होता त्यांचा पिवळा पट्टे असलेला शर्ट.

‘जीवन मृत्यू’ या चित्रपटात धर्मेंद्र राखीसोबत रोमान्स करताना दिसले होते. या चित्रपटातील एक गाणं आहे ज्यामध्ये ते राखीसोबत रोमान्स करताना पिवळा शर्ट घालतात. ‘झिलमिल सीतारों का’ असं त्या गाण्याचे शीर्षक आहे. त्यानंतर धर्मेंद्र आणि आशा पारेख यांचा ‘आया सावन झूम के आया’ हा चित्रपट आला, त्यामध्येही त्यांनी तोच पिवळा शर्ट घातलेला होता. हा शर्ट धर्मेंद्रसाठी लकी मानला जातो. त्यांचा हा चित्रपटही खूप यशस्वी ठरला. तसेच धर्मेंद्र आणि शर्मिला टागोर यांचा रोमान्स पाहणे सर्वांना खूप आवडले. त्यांनी ‘मेरे हमदम मेरे दोस्त’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटात एक गाणे होते, ज्यामध्ये त्यांनी तोच पिवळा शर्ट घातला होता. हे तिन्ही चित्रपट अतिशय यशस्वी ठरले होते.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...