ईशा देओलचा हैराण करणारा खुलासा, दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतरच पतीचे..

अभिनेते धर्मेंद्र यांची लेक ईशा देओल ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आहे. हेच नाही तर ईशा देओल आणि तिचा पती भरत यांच्यामध्ये जोरदार वाद सुरू असल्याचे सांगितले जातंय. आज यावर थेट मोठा खुलासा हा करण्यात आलाय. ज्यानंतर सर्वचजण हैराण झाले.

ईशा देओलचा हैराण करणारा खुलासा, दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतरच पतीचे..
| Updated on: Feb 07, 2024 | 1:18 PM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून एक चर्चा ही सतत रंगताना दिसत होती. अभिनेते धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची लेक ईशा देओल हिचा घटस्फोट झाला. मात्र, आतापर्यंत यावर काहीच खुलासा हा झाला नव्हता. आता एक हैराण करणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर करण्यात आली. ही पोस्ट पाहून अनेकांनी धक्का बसला. ईशा देओल ही तिच्या खासगी आयुष्यामुळे सध्या चांगलीच चर्चेत आलीये. ईशा देओल आणि तिचा पती भरत यांचा घटस्फोट झालाय. याबाबतचीच पोस्ट ही सोशल मीडियावर शेअर करण्यात आली. दोघांनीही संमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतल्याचे त्या पोस्टमध्ये सांगण्यात आलंय.

ईशा देओल हिने तिच्या एका पुस्तकामध्ये मोठा खुलासा हा केलाय. अत्यंत हैराण करणारे काही खुलासे हे ईशा द्ओल हिने तिच्या पुस्तकामध्ये केले आहेत. ईशा देओल आणि भरत यांनी 12 वर्षांनंतर तब्बल घटस्फोट घेतलाय. ईशा देओल आणि भरत यांच्या दोन मुली आहेत. याबद्दल काही मोठे खुलासे ईशा देओल हिने तिच्या पुस्तकामध्ये केले आहेत.

ईशा देओल हिने तिच्या ‘अम्मा मिया: स्टोरीज, अॅडवाइस अॅन्ड रेसिपीज फ्रॉम वन मदर टू अनदर’ या पुस्तकामध्ये सांगितले की, तिच्या दुसऱ्या मुलीच्या लग्नानंतर काय घडले. ईशा देओल हिने म्हटले की, दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर पती भरत याची चिडचिड वाढली. दोन मुलींना सांभाळताना मी त्याला अजिबातच वेळ देऊ शकत नव्हते.

हेच नाही तर भरत याने मला वेळ देणे बंद केले. भरतची चिडचिड वाढत होती. पुस्तकामध्ये पुढे ईशा देओल ही खुलासा करते की, तिने स्वत:च्या चुकांमध्ये सुधारणा केली. हेच नाही तर ईशा देओल हिने आपली लाईफ रोमॅटिंक बनवण्यासाठी अनेक प्रयत्नही केले. भरत तख्तानी आणि ईशा देओल यांच्यामधील काही वाद असल्याचे देखील सांगितले जाते.

मध्यंतरी एक चर्चा रंगताना दिसली की, ईशा देओल याचा पती भरत याचे विवाहबाह्य संबंध आहेत आणि यामुळेच ईशा देओल हिने घटस्फोट घेण्याच निर्णय घेतलाय. मात्र, पोस्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की, दोघांनी मिळून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. आता यांच्या घटस्फोटामुळे विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us