Video : गोळीबारात ड्रायव्हर जखमी, स्वत: कार चालवून हॉस्पीटल गाठलं, टायगर श्रॉफच्या हिमतीला सलाम!
डे एकूण तिघांपैकी दौघांनी टायगरच्या गाडीवर गोळ्या झाडल्या आहेत. गोळ्या झाडणारे दोघेही तरुण होते. एका हल्लेखोराजवळ असलेली बंदूक ऐनवेळी जाम झाली. त्यामुळे त्याला आणखी गोळ्या झाडता आल्या नाहीत.

Tiger Shroff firing : प्रसिद्ध अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुंबईतील जुहूच्या परिसरात तो फुटबॉल खेळून घरी परतत होता. याच वेळी तीन अज्ञात हल्लेखोरांनी टायगर श्रॉफच्या गाडीच्या अगदी जवळ जाऊन या गोळ्या झाडल्या आहेत. या घटनेनंतर संपूर्ण बॉलिवूडची झोप उडाली आहे. दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र घाबरण्याची गरज नाही. प्रत्येक सेलिब्रिटीची काळजी घेण्यासाठी यंत्रणा सक्षम आहे, असं शिंदे म्हणाले आहेत. दरम्यान या गोळीबाराच्या घटनेचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. एकूण तिघांनी टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार केला. या घटनेनंतर घाबरून न जाता टायगर श्रॉफने स्वत: गाडी चालवली आहे.
नेमकं काय घडलं?
समोर आलेल्या व्हिडीओनुसार टायगर श्रॉफवर गोळ्या झाडण्यासाठी तिघे आले होतो. त्यापैकी दौघांनी टायगरच्या गाडीजवळ जात त्याच्यावर थेट गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला. परंतु दैव बलवत्तर म्हणून टायगर श्रॉफला एकही गोळी लागली नाही. परंतु या हल्ल्यावेळी टायगर श्रॉफचा ड्रायव्हर मात्र जखमी झाला. हल्ला व्हायचा अगोदर टायगर श्रॉफ ड्रायव्हरच्या बाजूला बसलेला होता. परंतु आपला ड्रायव्हच जखमी झाल्याचे समजल्यानंतर टायगरने ड्रायव्हला आपल्या बाजूला बसवले आणि स्वत: गाडी चालवली.
#TigerShroff: A video purportedly shows the three assailants firing towards the actor and his car.
Extremely disturbing visuals. Such a relief to know that he is safe. 🙏 https://t.co/v9Inh4frgu
— Bollywood Talkies (@bolly_talkies) October 18, 2026
आजूबाजूचे लोक मदतीला धावले
ही घटना घडल्यानंतर आजूबाजूच्या सामान्य लोकांनी टायगर श्रॉफला मदत केली. एका व्यक्तीने टायगरच्या ड्रायव्हरला पकडून दुसऱ्या बाजूने बसले. तर एका महिलेने टायगरला ‘बाळा लवकर हॉस्पिटलला जा’ असे सांगत धीर देण्याचा प्रयत्न केला. हा संपूर्ण घटनाक्रम कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
Scenes from the venue after the assailants fled following the firing at #TigerShroff’s car.
A paparazzo captured the entire incident on video and explains what unfolded at the spot. https://t.co/3hwDImWLEO
— Bollywood Talkies (@bolly_talkies) October 18, 2026
रिक्षाचालक जखमी
दुसरीकडे एकूण तिघांपैकी दौघांनी टायगरच्या गाडीवर गोळ्या झाडल्या आहेत. गोळ्या झाडणारे दोघेही तरुण होते. एका हल्लेखोराजवळ असलेली बंदूक ऐनवेळी जाम झाली. त्यामुळे त्याला आणखी गोळ्या झाडता आल्या नाहीत. त्यामुळेच टायगर बालंबाल बचावला. या हल्ल्यात टायगरच्या ड्रायव्हरसोबतच एक रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे. रिक्षाचालकाच्या छातीला गोळी लागल्याचे सांगितले जात आहे. ही घटना घडल्यानंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. मुंबईत कलाकारांच्या सुरक्षेवर मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.
