VIDEO : लक्ष्मी अग्रवालच्या भूमिकेत दीपिका रस्त्यावर फिरली, कुणी ओळखलंही नाही

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या ‘छपाक’ या नवीन चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. नुकतेच छपाक या चित्रपटाचे पोस्टर शेअर करण्यात आले. या पोस्टरने सर्वजण आश्चर्यचकीत झाले होते. छपाक हा चित्रपट अॅसिड पीडित लक्ष्मी अग्रवालच्या जीवनावर आधारित आहे. यामध्ये दीपिकाने लक्ष्मी अग्रवालची हुबेहूब अशी भूमिका साकारली आहे. आता दीपिकाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल …

VIDEO : लक्ष्मी अग्रवालच्या भूमिकेत दीपिका रस्त्यावर फिरली, कुणी ओळखलंही नाही

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या ‘छपाक’ या नवीन चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. नुकतेच छपाक या चित्रपटाचे पोस्टर शेअर करण्यात आले. या पोस्टरने सर्वजण आश्चर्यचकीत झाले होते. छपाक हा चित्रपट अॅसिड पीडित लक्ष्मी अग्रवालच्या जीवनावर आधारित आहे. यामध्ये दीपिकाने लक्ष्मी अग्रवालची हुबेहूब अशी भूमिका साकारली आहे. आता दीपिकाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दीपिका पादूकोण अभिनेता विक्रांत मैसीसोबत बाईकवर दिसत आहे. यावेळी दीपिका रस्त्यात बिनधास्तपणे फिरत असून तिला कुणी ओळखतही नाही.

व्हिडीओमध्ये दीपिका आणि मैसी बाईकवरुन जाताना दिसत आहे. बाईक एका दुकानाच्या समोर थांबते आणि विक्रांत उतरुन रस्ता पार करत दुकानात जात आहे. दीपिका बाईकजवळ उभी राहते. पुन्हा विक्रांत बाईकजवळ येतो. तो दीपिकाला काहीतरी सांगतो आणि दीपिका त्याचे ऐकून आश्चर्यचकीत होते. दीपिकाने पिवळ्या रंगाचा सूट घातला आहे.

दीपिका पादुकोणच्या या व्हिडीओमध्ये फोटोग्राफर मानव मंगलानीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन व्हिडीओ शेअर केला आहे. दीपिका नुकतेच दिल्लीमधील जनपथमध्ये एक सीन शूट करत होती. तेव्हा तिला पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती. चित्रपटाची शूटिगं सलग सुरु आहे आणि हा चित्रपट पुढच्यावर्षी 10 जानेवारीला प्रदर्शित होईल. चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार करत आहेत.

काय आहे चित्रपटाची कथा?

छपाक  चित्रपट अॅसिड पीडित लक्ष्मी अग्रवालच्या जीवनावर आधारीत आहे. चित्रपटात विक्रांत मैसी लक्ष्मीच्या पतीची भूमिका साकारत आहे. तसेच दीपिका पादुकोणच्या भूमिकेचे नाव मालती आहे. चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर चाहते आता या चित्रपटाच्या टीजरची वाट पाहत आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *