Photo : अभिनेत्री अभिलाषा पाटील यांचं कोरोनामुळे निधन, मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा

अभिनेत्री अभिलाषा पाटील यांचं कोरोनानं निधन झालंय. (Actress Abhilasha Patil passes away due to corona, mourning on Marathi film industry)

VN | Updated on: May 05, 2021 | 4:43 PM
1 / 5
देशभरात कोरोनानं थैमान घातलं आहे. रोज अनेकांचा कोरोनामुळे मृत्यू होतोय. अशात आता मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री अभिलाषा पाटील यांचं कोरोनानं निधन झालंय.

देशभरात कोरोनानं थैमान घातलं आहे. रोज अनेकांचा कोरोनामुळे मृत्यू होतोय. अशात आता मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री अभिलाषा पाटील यांचं कोरोनानं निधन झालंय.

2 / 5

अभिलाषा यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेक भूमिका गाजवल्या आहेत. 'बायको देता का बायको', 'छिछोरे', 'प्रवास', यांसारख्या सिनेमांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. एवढंच नाही तर मालिकांमध्येसुद्धा त्यांनी उत्तम काम केलंय.

3 / 5

'बापमाणूस' या मालिकेतील त्यांची भूमिका लक्षवेधी होती.

4 / 5

अभिलाषा यांच्या निधनाची बातमी येताच मराठी मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

5 / 5

दुसऱ्या लाटेत अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झालीये. हिंदी मराठी कलाकारांना याचा फटका बसलाय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us