AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाफ्लॉप चित्रपटातील सुपरहिट गाणं, जे ऐकताच मनाला मिळतो सुकून, आजही अनेकजण…

महाफ्लॉप चित्रपटातील सुपरहिट गाणं, अरिजीत सिंहच्या आवाजामुळे ठरलं प्रचंड लोकप्रिय. मनाला शांती देते हे गाणं. आजही अनेकांचं आवडतं.

महाफ्लॉप चित्रपटातील सुपरहिट गाणं, जे ऐकताच मनाला मिळतो सुकून, आजही अनेकजण...
Image Credit source: Social media
| Updated on: Sep 24, 2026 | 7:34 PM
Share

बॉलिवूडमधील लोकप्रिय गायक अरिजीत सिंह यांच्या आवाजाची जादू आजही कायम आहे. त्यांच्या आवाजातील गाणी चित्रपटाच्या यशापयशापलीकडे जाऊन प्रेक्षकांच्या मनात घर करतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमिर खान आणि करीना कपूर यांच्या ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटातील ‘तेरे हवाले’ हे गाणं.

2022 मध्ये प्रदर्शित झालेला ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळवू शकला नाही. मात्र, या चित्रपटातील ‘तेरे हवाले’ हे रोमँटिक गाणं प्रचंड लोकप्रिय ठरलं. अरिजीत सिंह आणि शिल्पा राव यांनी या गाण्याला आपला आवाज दिला आहे. आजही अनेकांच्या प्लेलिस्टमध्ये हे गाणं आवर्जून ऐकलं जातं.

यूट्यूबवर गाण्याला लाखो व्ह्यूज

‘तेरे हवाले’ या गाण्याला संगीतकार प्रीतम यांनी संगीत दिलं असून गीतकार अमिताभ भट्टाचार्य यांनी त्याचे शब्द लिहिले आहेत. आमिर खान आणि करीना कपूर यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या या गाण्याने प्रेक्षकांच्या मनावर वेगळीच छाप पाडली. गाण्याच्या भावस्पर्शी शब्दांसोबतच अरिजीत आणि शिल्पा राव यांच्या आवाजाने त्याला आणखी खास बनवलं.

विशेष म्हणजे, ‘लाल सिंह चड्ढा’ बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला असला तरी चित्रपटातील संगीताला मात्र चांगला प्रतिसाद मिळाला. ‘तेरे हवाले’ हे गाणं आजही सोशल मीडिया आणि म्युझिक प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात ऐकलं जातं. यूट्यूबवरही या गाण्याला कोट्यवधी व्ह्यूज मिळाले आहेत.

चित्रपट फ्लॉप पण गाणी सुपरहिट

11 ऑगस्ट 2022 रोजी ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाच्या बहिष्काराची मागणी सोशल मीडियावर जोर धरत होती. चित्रपटाचा मोठा बजेट असूनही बॉक्स ऑफिसवर त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.

मात्र, चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनानंतर प्रेक्षकांकडून त्याला तुलनेने चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे ‘लाल सिंह चड्ढा’च्या अपयशानंतरही त्यातील ‘तेरे हवाले’ हे गाणं मात्र प्रेक्षकांच्या मनात कायम राहिलं. चित्रपट फ्लॉप ठरला असला, तरी अरिजीत सिंह आणि शिल्पा राव यांच्या आवाजातील या गाण्याने संगीतप्रेमींच्या मनावर आपली वेगळी जागा निर्माण केली.

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा