AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या अभिनेत्रीने ‘वन नाईट स्टँड’पासून सुरु केलं आयुष्य, पण प्रपोज करताना नवऱ्याने घेतलं एक्स गर्लफ्रेंडचं नाव

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जिच्या आयुष्याची सुरुवात वन नाईट स्टँडने सुरु झाली. मात्र, नवऱ्याने प्रपोज करताना घेतलं होतं एक्स गर्लफ्रेंडचं नाव. कोण आहे ती अभिनेत्री?

या अभिनेत्रीने 'वन नाईट स्टँड'पासून सुरु केलं आयुष्य, पण प्रपोज करताना नवऱ्याने घेतलं एक्स गर्लफ्रेंडचं नाव
Image Credit source: Social media
| Updated on: Jan 21, 2026 | 12:42 PM
Share

Bollywood Actress : बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत, ज्यांनी वन-नाईट स्टँड केलं आहे. यामध्ये काहींनी तर अनेक वर्षे वन-नाईट स्टँड करून नंतर लग्न देखील केलं आहे. यामध्ये बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री अर्चना पूरन सिंग आणि अभिनेते परमीत सेठी हे गेली जवळपास 38 वर्षे एकत्र आहेत. नुकत्याच त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये या जोडप्याने आपल्या डेटिंगच्या दिवसांपासून ते आयुष्यभराच्या सहवासापर्यंतचा प्रवास प्रामाणिकपणे उलगडून सांगितला आहे. विशेष म्हणजे, त्यांनी कबूल केले की त्यांच्या नात्याची सुरुवात एक ‘वन-नाईट स्टँड’ म्हणून झाली होती. जी पुढे एका गंभीर आणि मजबूत नात्यात रूपांतरित झाली.

अर्चना आणि परमीत यांनी त्यांच्या पहिल्या भेटीची आठवण काढताना सांगितले की, 1988 साली ते एका मित्राच्या घरी पहिल्यांदा भेटले. त्या रात्री मित्रांसोबत गप्पा गोष्टी केल्यानंतर त्यांच्यात संवाद सुरू झाला. दुसऱ्या दिवशी अर्चनाला परमीतचा फोन येईल की नाही अशी अपेक्षा होती आणि विशेष म्हणजे परमीतने तिला फोन केलाच. त्यानंतर दोघांमध्ये नियमित बोलणे सुरू झाले आणि ते एकमेकांपासून दूर राहू शकत नव्हते.

त्या काळात अर्चनाने नुकतेच तिच्या एक्ससोबत ब्रेकअप केला होता आणि परमीतही त्याच्या मागील नात्यातून बाहेर आला होता. दोघेही ‘रिबाउंड फेज’मध्ये होते. अर्चना म्हणाली, ‘लोक म्हणतात की रिबाउंड रिलेशनशिप टिकत नाहीत पण आम्ही जिवंत उदाहरण आहोत की अशी नातीही यशस्वी होऊ शकतात.’

त्या काळात अर्चना 1987 मधील ‘जलवा’ चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या शिखरावर होती. परमीतने कबूल केले की, ‘ती खूप ‘हॉट आणि आनंदी होती. परमीतला वाटायचं तो मध्यमवर्गीय कुटुंबातून आला होता आणि तिने नुकताच मोठा चित्रपट केला होता. माझ्यासारख्या मुलाला ती कधी होकार देणार असं परमीतला वाटत होतं.’

चुकून एक्सचे नाव घेतल्याचा किस्सा

अर्चनाने त्यांच्या नात्याच्या सुरुवातीच्या महिन्यांमधील एक मजेशीर पण धक्कादायक प्रसंगही सांगितला. एकदा परमीतने प्रेम व्यक्त करताना चुकून आपल्या एक्स-गर्लफ्रेंडचे नाव घेतले होते. अर्चना म्हणाली, ‘तू माझ्या किचनमध्ये उभा होतास आणि म्हणालास, परमीत आणि अमुक-तमुकची जोडी कायम राहील पण त्या वाक्यात माझं नाव नव्हतं. हा किस्सा ऐकून परमीत खरोखरच आश्चर्यचकित झाला. कारण त्याला ही घटना अजिबात आठवत नव्हती.

दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.