AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पहिल्या चित्रपटासाठी 10 रुपये फी, नंतर बनली सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री, बाप-मुलासोबत केलाय रोमान्स

80 च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री, जिला पहिल्या चित्रपटासाठी मिळालेले 10 रुपये मानधन. नंतर ठरली सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री. बाप-मुलासोबत केला आहे रोमान्स.

पहिल्या चित्रपटासाठी 10 रुपये फी, नंतर बनली सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री, बाप-मुलासोबत केलाय रोमान्स
Image Credit source: Social media
| Updated on: Apr 03, 2026 | 6:35 PM
Share

हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय गाणं ‘गोरी है कलैया’ मुळे प्रसिद्ध झालेल्या जया प्रदा यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही.70 आणि 80 च्या दशकात त्यांनी चित्रपटसृष्टीवर अक्षरशः अधिराज्य गाजवलं होतं. त्या काळात त्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये गणल्या जात होत्या. मात्र, प्रेमात त्यांनी स्वतःच्या करिअरवर मोठा धोका पत्करल्याची चर्चा आजही रंगते.

जया प्रदा यांनी केवळ 14 व्या वर्षी Bhoomi Kosam या तेलुगू चित्रपटातून अभिनयाची सुरुवात केली. हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी सरगम या चित्रपटातून पदार्पण केलं, ज्यात त्यांच्यासोबत ऋषी कपूर दिसले होते. त्यानंतर त्यांनी अनेक हिट आणि सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करत आपली वेगळी ओळख निर्माण केली.

10 रुपये मानधन

धमेंद्र यांच्यासोबत त्यांची जोडी प्रचंड लोकप्रिय ठरली. ‘शहजादे’, ‘धर्म और कानून’, ‘न्यायदाता’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी एकत्र काम केलं. तसेच सनी देओल याच्यासोबतही त्या ‘वीरता’ आणि ‘मजबूर’ या चित्रपटांत झळकल्या. विशेष म्हणजे, आपल्या पहिल्या चित्रपटासाठी त्यांनी केवळ 10 रुपये मानधन घेतलं होतं आणि नंतर त्या इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक बनल्या.

मात्र, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे त्या नेहमीच चर्चेत राहिल्या. जया प्रदा आणि चित्रपट निर्माते श्रीकांत नहाटा यांच्यातील प्रेमसंबंध त्या काळात खूप गाजले. 80 च्या दशकात आयकर विभागाच्या कारवाईदरम्यान श्रीकांत नाहटा यांनी त्यांना दिलेला पाठिंबा त्यांच्या नात्याची सुरुवात ठरल्याचं सांगितलं जातं.

बहिणीच्या मुलाला दत्तक घेतलं

1986 साली दिलेल्या एका मुलाखतीत जया प्रदा यांनी या नात्याची कबुली दिली होती. त्यांनी हेही स्पष्ट केलं होतं की, त्यांनी आपल्या कुटुंबापासून काहीही लपवले नव्हते. मात्र, या नात्याचा त्यांच्या करिअरवर परिणाम झाला. लग्नाच्या चर्चांनंतर त्यांच्या करिअरचा उतार सुरू झाल्याचं म्हटलं जातं.

श्रीकांत नाहटा आधीपासूनच विवाहित असल्यामुळे जया प्रदा यांना त्यांच्या घरी राहता आलं नाही. त्यामुळे त्या वेगळ्या राहू लागल्या. पुढे त्यांनी आपल्या बहिणीच्या मुलाला दत्तक घेतलं आणि त्याचा सांभाळ केला. चित्रपटसृष्टीपासून काही काळ दूर राहिल्यानंतर जया प्रदा यांनी राजकारणातही प्रवेश केला. त्यांचं खरं नाव ललिता राणी राव असं असून, नंतर त्यांनी ‘जया प्रदा’ हे नाव धारण केलं.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...