AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रश्मिका मंदानाने दिली खुशखबर, लवकरच होणार आई? व्हिडीओ पोस्ट केल्याने शुभेच्छांचा वर्षाव!

अभिनेत्री रश्मिका मंदाना प्रेग्नेंट असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तिने इन्स्टाग्राम खात्यावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. याच व्हिडीओमुळे ती लवकरच आई होणार असल्याचा दावा केला जातोय.

रश्मिका मंदानाने दिली खुशखबर, लवकरच होणार आई? व्हिडीओ पोस्ट केल्याने शुभेच्छांचा वर्षाव!
rashmika mandanna pregnantImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 03, 2026 | 9:06 PM
Share

Rashmika Mandanna Pregnant : प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा यांनी 26 फेब्रुवारी 2026 रोजी मोठ्या थाटामाटात लग्न केलं. या लग्नाचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे. विवाह सोहळ्यासाठी त्यांनी डेकोरेशन आणि पेहरावासाठी निवडलेल्या थिमची देशभरात चर्चा झाली. लग्नसोहळ्यात विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना हे एखाद्या राजा-राणीप्रमाणे दिसत होते. अत्यंत शाही थाटात झालेल्या या विवाहाची चर्चा झाला झाल्यानंतर आता पुन्हा एकदा हे कपल सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. रश्मिका मंदानाने इन्स्टाग्रामवर केलेल्या एका पोस्टमुळे ती आई होणार असल्याचा अंदाज लावला जात आहे.

रश्मिका मंदानाने नेमकं काय पोस्ट केलं आहे?

रश्मिका मंदानाने तिच्या इन्स्टाग्राम खात्यावर एक ग्राफिक्स व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रश्मिका तसेच विजय देवरकोंडा यांच्या तोंडवळ्याप्रमाणे असलेले एक कपल दिसत आहे. याच व्हिडीओत एक पिवळ्या रंगाचे सुंदर फुल आहे. हे फुल रश्मिकाशी खेळत असल्याचे दाखवण्यात आले आहे. सोबतच विजय देवरकोंडा आणि रश्मिका अगदी खुश असल्याचे या व्हिडीओत भासत आहे. त्यामुळेच रश्मिका लग्नानंतर प्रेग्नेंट असून ती लवकरच आई होणार असल्याचा अंदाज लावला जात आहे.

रश्मिकाच्या व्हिडीओवरील कॅप्शनमुळे सस्पेन्स वाढला

विशेष म्हणजे रश्मिका मंदानाने हा व्हिडीओ पोस्ट करताना एक खास कॅप्शन दिले आहे. आता आम्ही तिघे झालो आहोत, असं सूचक कॅप्शन तिने दिले आहे. त्यामुळेही ती आई होणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, रश्मिकाने मात्र व्हिडीओत कुठेही मी आई होणार असल्याचे सांगितलेले नाही. त्यामुळेच तिच्या या पोस्टचा सस्पेन्स वाढला आहे. तिने हा व्हिडीओ पोस्ट करताना तिने ‘टेरिबली टिनी पोस्ट’ या इन्स्टाग्राम खात्याला टॅग केलं आहे. त्यामुळे आता रश्मिका खरंच आई होणार का? असा प्रश्न तिच्या फॅन्सकडून उपस्थित केला जात आहे. भविष्यात या प्रश्नाचे उत्तर मिळलेच. परंतु सध्यातरी विजय देवरकोंडा आणि रश्मिकाचे चाहते या दोघांनाही शुभेच्छा देत आहेत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...