अभिनेत्री सलमा आगा यांच्या कन्येला बलात्कार-हत्येची धमकी, महिलेला अटक

| Updated on: Dec 25, 2020 | 1:58 PM

अभिनेत्री सलमा आगा यांची कन्या झारा अहमद खानला आरोपी नुरा सरवर बलात्कार-हत्येची धमकी देत होती

अभिनेत्री सलमा आगा यांच्या कन्येला बलात्कार-हत्येची धमकी, महिलेला अटक
हॉटेल्समध्ये महिला कितपत सुरक्षित राहतील, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
Follow us on

मुंबई : प्रख्यात अभिनेत्री सलमा आगा (Salma Agha) यांच्या कन्येला बलात्कार आणि हत्येची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानी वंशाची ब्रिटीश अभिनेत्री-गायिका झारा खानला (Zara Khan) सोशल मीडियावरुन धमकी देण्यात आली होती. विशेष म्हणजे झाराला बलात्काराची धमकी देणारी आरोपी महिला आहे. (Actress Salma Agha daughter Zara Khan Rape Murder threat accuse arrested in Hyderabad)

मुंबईतील वर्सोवा पोलिसांनी आरोपी महिलेला हैदराबादमधून अटक केली. नुरा सरवर असं आरोपी महिलेचं नाव असून तिने आपणच या धमक्या दिल्याचं कबूल केलं आहे. इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडिया अकाऊण्टच्या माध्यमातून बनावट अकाऊण्ट्स तयार करुन नुरा धमक्या देत असल्याचं समोर आलं आहे.

झारा खानचे स्टॉकिंग

39 वर्षीय आरोपी महिला हैदराबादमधील मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह असल्याची माहिती आहे. अभिनेत्री सलमा आगा यांची कन्या झारा अहमद खानवर नुरा ऑनलाईन पाळत (Stalking) ठेवत होती. तसंच झाराविषयी आक्षेपार्ह लैंगिक पोस्ट टाकून तिला विनयभंग-बलात्कार आणि हत्येची धमकी दिल्याचा आरोप नुरा सरवर हिच्यावर आहे.

नुरा सरवरचा देवदूत असल्याचा दावा

28 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत नुराने धमकी दिल्याचा आरोप आहे. झाराने नुराला इन्स्टाग्रामवर ब्लॉक केलं होतं. नुरा सरवरने आपण देवदूत असल्याचा दावा केला आहे. झारामुळे आपला साखरपुडा मोडल्याचाही नुराला संशय होता. नुरा सध्या बेरोजगार आहे.

अन्य सेलिब्रिटींनाही नुराच्या धमक्या

नुराने मॉडेल साहिल पीरझादा, अभिनेता कुशल टंडन, कमाल आर खान आणि एजाझ खान यांनाही धमक्या दिल्याचा दावा केला जात आहे. नुराचा नेमका उद्देश काय होता, हे अद्याप स्पष्ट झालं नसल्याचं पोलिसांनी सांगितलं.

सेलिब्रिटी कायमच सॉफ्ट टार्गेट

याआधी दाक्षिणात्य अभिनेता विजय सेतूपतीच्या कुटुंबियांनाही सोशल मीडियावर ट्रोलर्सनी निशाणा केले होते. विजय सेतूपतीच्या मुलीला सोशल मीडियावरुन बलात्काराच्या धमक्या देण्यात येत होत्या. श्रीलंकेचा दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन (Muttiah Muralitharan) याच्या जीवनावर बनणाऱ्या ‘800’ चित्रपटात विजय मुख्य भूमिका साकारणार होता. मात्र वादानंतर त्याने हा चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला. याशिवाय अभिनेत्री कंगना रनौत, महेंद्रसिंह धोनीची कन्या यांनाही ट्रोलर्सनी निशाण्यावर धरले होते.

संबंधित बातम्या :

‘800’तून बाहेर पडल्यानंतरही वाद सुरूच, विजय सेतूपतीच्या मुलीला बलात्काराची धमकी

(Actress Salma Agha daughter Zara Khan Rape Murder threat accuse arrested in Hyderabad)