मुरलीधरनचा बायोपिक ‘800’ मधून विजय सेतूपतीची माघार

श्रीलंकेचा दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन (Muttiah Muralitharan) याच्या जीवनावर चित्रपट बनवला जात आहे.

मुरलीधरनचा बायोपिक '800' मधून विजय सेतूपतीची माघार
Follow us
| Updated on: Oct 19, 2020 | 11:09 PM

मुंबई : श्रीलंकेचा दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन (Muttiah Muralitharan) याच्या जीवनावर चित्रपट बनवला जात आहे. तमिळ सुपरस्टार विजय सेतूपती (Vijay Sethupathi) या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार असल्याचे घोषित करण्यात आले होते. गेल्या आठवड्यात चित्रपटाचे मोशन पोस्टर लाँच करण्यात आले. यामध्ये हुबेहुब मुरलीधरनसारखा दिसणाऱ्या विजय सेतूपतीने सर्वांचे लक्ष वेधले. परंतु चित्रपटाची घोषणा झाल्यापासून विजय सेतूपतीला चाहत्यांच्या आणि तमिळ भाषिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. (Vijay Sethupathi exits Muralitharan biopic 800, superstar shares ex cricketers emotional letter)

विजय सेतूपतीला विरोध होऊ लागल्याने त्याने या चित्रपटातूत काढता पाय घेतला आहे. चित्रपट सोडण्याबाबत विजयने आज ट्विटरद्वारे घोषणा केली आहे. विजय सेतूपतीने ही घोषणा करत असताना मुथय्या मुरलीधरनचं एक भावनिक पत्रदेखील शेअर केलं आहे. मुरलीधरने विजयला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, हा चित्रपट केल्यामुळे तुझ्या करिअरचं मोठं नुकसान होईल. त्यामुळे तू हा चित्रपट करु नये. हे पत्र शेअर करत विजयने ट्विटमध्ये धन्यवाद आणि निरोप घेतो असं म्हटलं आहे.

काय म्हणाला मुरलीधरन?

मुरलीधरनने म्हटले आहे की, “काही लोकांमध्ये गैरसमज असल्यामुळे माझा बायोपिक असलेला चित्रपट ‘800’ हा सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. काही लोक अभिनेता विजय सेतूपतीवर चित्रपट सोडण्यासाठी दबाव आणत आहेत. तमिळनाडूमधल्या एका उत्कृष्ट अभिनेत्याला माझ्या चित्रपटामुळे कोणताही त्रास झाला तर मला ते चालणार नाही. त्यामुळे मी विजयला विनंती करतो की, त्याने हा प्रोजेक्ट सोडून द्यावा. मला वाटतं की, या चित्रपटामुळे विजयच्या करिअरमध्ये कोणताही अडथळा होऊ नये. मी कोणत्याही अडथळ्यांना घाबरत नाही. मी त्यांच्यावर नियंत्रण मिळवतो. ते करतच मी आज इथपर्यंत पोहोचलो आहे”.

मला आशा आहे की, चित्रपटाचे निर्माते या चित्रपटाच्या वाटेतील सर्व अडथळे दूर करतील. त्यांनी मला आश्वासन दिलं आहे की, ते या चित्रपटाबाबत लवकरच नवी घोषणा करतील. मी त्यांच्या निर्णयासोबत असेन. कठीण प्रसंगी माझी साथ देणाऱ्या मीडिया, राजकीय मंडळी, विजय सेतूपतीचे चाहते आणि महत्त्वाचं म्हणजे तमिळनाडूमधील जनतेचा मी मनापासून आभारी आहे.

काय होतोय चित्रपटाला विरोध?

चित्रपटाची घोषणा होताच प्रेक्षकांनी अभिनेता विजय सेतूपतीला शुभेच्छा देण्यास सुरुवात केली. ट्विटवर मुरलीधरन आणि विजय सेतूपती या दोघांचेही चाहते मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे दोघांच्याही चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु केला. परंतु काही लोकांनी श्रीलंकन क्रिकेटरचा बायोपिक करणाऱ्या विजयला ट्रोल करणे सुरु केले. अनेकांनी या चित्रपटाला विरोध केला आहे. काहींचं म्हणणं आहे की, विजय सेतूपती भारतीय आहे तरीदेखील तो आपल्या छातीवर श्रीलंकेचा झेंडा कसा काय लावू शकतो?

अनेक तमिळ भाषिकांनीदेखील विजयला लक्ष्य केले आहे. श्रीलंकेत तमिळ भाषिक लोक अल्पसंख्यांक आहेत. गेल्या अनेक दशकांपासून तिथले बहुसंख्य सिंहली लोक तमिळ भाषिकांवर अत्याचार करत आहेत. तसेच 1983 ते 2009 या काळात श्रीलंकेत झालेल्या गृहयुद्धात असंख्य तमिळ भाषिकांची हत्या करण्यात आली. सिंहली लोकांच्या त्रासाला कंटाळून मोठ्या संख्येने तमिळ भाषिक लोक रेफ्युजी बनून भारतात आले. त्यामुळे काही तमिळ भाषिकांना विजयने श्रीलंकन क्रिकेटरच्या बायोपिकमध्ये काम करणं पटलेलं नाही. हे लोक विजयचा विरोध करत आहेत.

काही तमिळ भाषिकांचे म्हणणे आहे की, ज्या श्रीलंकेत गेल्या अनेक दशकांपासून तमिळ भाषिकांवर अन्याय, अत्याचार होत आला आहे. तिथल्या क्रिकेटरच्या बायोपिकमध्ये विजय सेतूपतीने काम करु नये. काही तमिळ भाषिक विजयचे कौतुक करत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की, जर अमेरिका महात्मा गांधींचा बायोपिक करुन शकतो तर भारतातील लोकांनी श्रीलंकन असलेल्या मुरलीधरनचा बायोपिक केला म्हणून काय बिघडलं? दरम्यान विजयला विरोध करणाऱ्यांनी ट्विटरवर #ShameOnVijaySethupathi हा हॅशटॅग ट्रेण्ड केला होता.

संबंधित बातम्या

Muralitharan Biopic : तमिळ भाषिकांचा नरसंहार आठव; मुरलीधरन बनलेल्या विजय सेतूपतीवर नेटिझन्स भडकले

IPL 2020 | प्लेऑफमध्ये ‘हे’ तीन संघ पोहचणार, अजित आगरकरची भविष्यवाणी

Gautam Gambhir Birthday | तू होतास म्हणून…, गंभीरच्या वाढदिनी चाहत्यांकडून 2011 च्या वर्ल्डकपची आठवण

“मुंबईच्या ‘या’ विध्वंसक फलंदाजाची दोन महिन्यात टीम इंडियात निवड होणार”

IPL 2020 mid-season transfer | ‘या’ नियमानुसार आयपीएलमध्ये खेळाडूंची अदलाबदल करता येणार

Chris Gayle | युनिव्हर्सल बॉस’ ख्रिस गेल रुग्णालयात, बेडवरुन चाहत्यांना खास संदेश

IPL 2020 | मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर दिल्लीला दुहेरी झटका, ‘हा’ आक्रमक खेळाडू दुखापतीमुळे सामन्यांना मुकणार

(Vijay Sethupathi exits Muralitharan biopic 800, superstar shares ex cricketers emotional letter)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.