AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Muralitharan Biopic : तमिळ भाषिकांचा नरसंहार आठव; मुरलीधरन बनलेल्या विजय सेतूपतीवर नेटिझन्स भडकले

श्रीलंकेचा दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन याच्या जीवनावर चित्रपट बनवला जात आहे. तमिळ सुपरस्टार विजय सेतूपती या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे.

Muralitharan Biopic : तमिळ भाषिकांचा नरसंहार आठव; मुरलीधरन बनलेल्या विजय सेतूपतीवर नेटिझन्स भडकले
| Updated on: Oct 14, 2020 | 7:44 PM
Share

मुंबई : श्रीलंकेचा दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन (Muthiah Muralidaran) याच्या जीवनावर चित्रपट बनवला जात आहे. तमिळ सुपरस्टार विजय सेतूपती (Vijay Sethupathi) या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ‘मुथय्या मुरलीधरन’च्या बायोपिकची चर्चा सुरू होती. गेल्या आठवड्यात त्यावर शिक्कामोर्तब झाले. आज चित्रपटाचे मोशन पोस्टर लाँच करण्यात आले. (twitter users trend shame on vijay sethupathi after muralitharan biopic 800 motion poster release)

‘800’ असे मुरलीधरनच्या बायोपिकचे नाव असून 13 ऑक्टोबर रोजी आयपीएलमधील चेन्नई सुपरकिंग्स (Chennai Super Kings) आणि सनरायजर्स हैदराबादमधील सामन्यापूर्वी या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले. या मोशन पोस्टरमध्ये मुरलीधरनचे आयुष्य अॅनिमेशन रुपात थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मोशन पोस्टरवरुन स्पष्ट होत आहे की, श्रीलंकेतील गृह युद्धापासून ते मुरलीधरन क्रिकेटर बनेपर्यंतचा प्रवास आणि त्याच्या गोलंदाजीवर उपस्थित केलेले प्रश्न या सर्वांवर हा चित्रपट भाष्य करणार आहे.

चित्रपटाची घोषणा होताच प्रेक्षकांनी अभिनेता विजय सेतूपतीला शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे. ट्विटवर मुरलीधरन आणि विजय सेतूपती या दोघांचेही चाहते मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे दोघांच्याही चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु केला आहे. परंतु श्रीलंकन क्रिकेटरचा बायोपिक करणाऱ्या विजयला ट्रोल केले जाऊ लागले आहे. अनेकांनी या चित्रपटाला विरोध केला आहे. काहींचं म्हणणं आहे की, विजय सेतूपती भारतीय आहे तरीदेखील ते आपल्या छातीवर श्रीलंकेचा झेंडा कसा काय लावू शकतो?

अनेक तमिळ भाषिकांनीदेखील विजयला लक्ष्य केले आहे. श्रीलंकेत तमिळ भाषिक लोक अल्पसंख्यांक आहेत. गेल्या अनेक दशकांपासून तिथले बहुसंख्य सिंहली लोक तमिळ भाषिकांवर अत्याचार करत आहेत. तसेच 1983 ते 2009 या काळात श्रीलंकेत झालेल्या गृहयुद्धात असंख्य तमिळ भाषिकांची हत्या करण्यात आली. सिंहली लोकांच्या त्रासाला कंटाळून मोठ्या संख्येने तमिळ भाषिक लोक रेफ्युजी बनून भारतात आले. त्यामुळे काही तमिळ भाषिकांना विजयने श्रीलंकन क्रिकेटरच्या बायोपिकमध्ये काम करणं पटलेलं नाही. हे लोक विजयचा विरोध करत आहेत.

काही तमिळ भाषिकांचे म्हणणे आहे की, ज्या श्रीलंकेत गेल्या अनेक दशकांपासून तमिळ भाषिकांवर अन्याय, अत्याचार होत आला आहे. तिथल्या क्रिकेटरच्या बायोपिकमध्ये विजय सेतूपतीने काम करु नये. काही तमिळ भाषिक विजयचे कौतुक करत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की, जर अमेरिका महात्मा गांधींचा बायोपिक करुन शकतो तर भारतातील लोकांनी श्रीलंकन असलेल्या मुरलीधरनचा बायोपिक केला म्हणून काय बिघडलं? दरम्यान विजयला विरोध करणाऱ्यांनी ट्विटरवर #ShameOnVijaySethupathi हा हॅशटॅग ट्रेण्ड केला होता.

संबंधित बातम्या

IPL 2020 | प्लेऑफमध्ये ‘हे’ तीन संघ पोहचणार, अजित आगरकरची भविष्यवाणी

Gautam Gambhir Birthday | तू होतास म्हणून…, गंभीरच्या वाढदिनी चाहत्यांकडून 2011 च्या वर्ल्डकपची आठवण

“मुंबईच्या ‘या’ विध्वंसक फलंदाजाची दोन महिन्यात टीम इंडियात निवड होणार”

IPL 2020 mid-season transfer | ‘या’ नियमानुसार आयपीएलमध्ये खेळाडूंची अदलाबदल करता येणार

Chris Gayle | युनिव्हर्सल बॉस’ ख्रिस गेल रुग्णालयात, बेडवरुन चाहत्यांना खास संदेश

IPL 2020 | मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर दिल्लीला दुहेरी झटका, ‘हा’ आक्रमक खेळाडू दुखापतीमुळे सामन्यांना मुकणार

(twitter users trend shame on vijay sethupathi after muralitharan biopic 800 motion poster release)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.