IPL 2020 | प्लेऑफमध्ये ‘हे’ तीन संघ पोहचणार, अजित आगरकरची भविष्यवाणी

भारताचा माजी खेळाडू अजित आगरकरने एका विशेष कार्यक्रमात याबाबत भविष्यवाणी केली आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 0:09 AM, 14 Oct 2020
IPL 2020 These three teams will reach the playoffs predicts Ajit Agarkar

दुबई : आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020) मोसमातील अर्धा टप्पा पूर्ण झाला आहे. प्रत्येक टीमने आतापर्यंत किमान 7 सामने खेळले आहेत. प्लेऑफच्या टॉप 4 मध्ये जागा बनवण्यासाठी आता चुरस पाहायला मिळणार आहे. ”प्लेऑफमध्ये मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि कोलतकाता नाईट रायडर्स हे 3 संघ निश्चित पोहचतील”, अशी भविष्यवाणी भारताचा माजी गोलंदाज अजित आगरकर याने केली आहे. पॉइंट्सटेबलमध्ये मुंबई, दिल्ली अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर कोलकाता चौथ्या क्रमांकावर आहे. (IPL 2020 These three teams will reach the playoffs predicts Ajit Agarkar)

“आयपीएल स्पर्धा फार चुरशीची होते. या स्पर्धेत फार चढ उतार आहेत. मुंबई आणि दिल्लीने यंदाच्या मोसमात चांगली कामगिरी केली आहे”, असं आगरकर क्रिकेट कनेक्टेड या विशेष कार्यक्रमात म्हणाला. चेन्नईविरुद्ध झालेल्या सामन्यात कोलकाताचा विजय झाला. या सामन्यात कोलकाताला 2 पॉइंट्स बोनसच मिळाले. यामुळे प्लेऑफमध्ये कोलकाता तिसऱ्या जागेसाठी दावेदार आहे”, असंही आगरकरने म्हटलं.

चौथी टीम कोणती ?

“राजस्थान रॉयल्स किंवा सनरायजर्स हैदराबाद या दोघांपैकी एक संघ हा प्लेऑफच्या चौथ्या क्रमांकासाठीचा प्रबळ दावेदार आहे. याआधी माझ्यासाठी चेन्नई ही प्लेऑफच्या चौथ्या क्रमांकाची टीम होती. मात्र चेन्नईच्या तुलनेत हैदराबाद आणि राजस्थान चांगली कामगिरी करत आहेत”, असं आगरकरने नमूद केलं. चेन्नईने आतापर्यंत एकूण 8 सामने खेळले आहेत. यापैकी 5 सामन्यात चेन्नईला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तर फक्त 3 सामान्यातच विजय झाला आहे. चेन्नई पॉइंट्सटेबलमध्ये 6 पॉइंट्ससह सहाव्या क्रमांकावर आहे.

आगरकरची आयपीएल कारकिर्द

अजित आगरकरने आयपीएलमध्ये एकूण 42 सामने खेळले आहेत. या 42 सामन्यात आगरकरने 29 विकेट्स घेतल्या आहेत. 29 धावा देऊन 3 विकेट्स ही त्याची सर्वोच्च खेळी राहिली आहे. तर बॅटिंग करताना आगरकरने 179 धावा केल्या आहेत. 39 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या राहिली आहे.

संबंधित बातम्या :

IPL 2020, SRH vs CSK : चेन्नई सुपर किंग्जसची सनरायजर्स हैदराबादवर 20 धावांनी मात

(IPL 2020 These three teams will reach the playoffs predicts Ajit Agarkar)