“मुंबईच्या ‘या’ विध्वंसक फलंदाजाची दोन महिन्यात टीम इंडियात निवड होणार”

मुंबईच्या 'या' विध्वंसक फलंदाजाची दोन महिन्यात टीम इंडियात निवड होणार

IPL 2020 मध्ये आपली विस्फोटक फलंदाजी दाखवून प्रेक्षकांच्या डोळ्यांचं पारणं फेडणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या एका फलंदाजाने सर्वांची मनं जिंकली आहेत.

अक्षय चोरगे

|

Oct 13, 2020 | 7:11 PM

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) आपली विस्फोटक फलंदाजी दाखवून प्रेक्षकांच्या डोळ्यांचं पारणं फेडणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या एका फलंदाजाने सर्वांची मनं जिंकली आहेत. अनेक प्रकारचे क्रिकेट शॉट्स, अवघड स्विच हिट, अप्पर कट, स्विप शॉट असे अनेक तीर या फलंदाजाच्या भात्यात आहेत. या खेळाडूला लोक भारताचा मिस्टर 360 डिग्री फलंदाज म्हणू लागले आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये त्याने धुमाकूळ घातला आहे. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) असं या खेळाडूचं नाव आहे. (before the end of 2020 Suryakumar Yadav will be a part of Indian team says Aakash Chopra)

सूर्यकुमारने मागील दोन वर्षांप्रमाणे यावर्षीदेखील मुंबई इंडियन्स संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. “सूर्यकुमार यादव पुढील दोन-तीन महिन्यांमध्ये भारतीय संघात दिसेल”, अशी भविष्यवाणी माजी क्रिकेटर आणि कमेंटेटर आकाश चोप्रा याने केली आहे. सूर्यकुमारची मागील दोन-तीन सामन्यांमधील फलंदाजी पाहून आकाश चोप्राने त्याचं मत व्यक्त केलं आहे. आकाश चोप्राच्या मते या वर्षीच्या शेवटपर्यंत सूर्यकुमार यादव भारतीय संघात दिसू शकतो.

आकाश चोप्राच्या मते सूर्यकुमार यादव गेमचेंजर ठरतोय. राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्सविरोधात फलंदाजी करताना सूर्यकुमारने कव्हर क्षेत्रात मारलेले फटके, कट आणि फ्लिक शॉट पाहून आकाश चोप्रा प्रभावित झाला आहे. आकाश चोप्रा म्हणाला की कगिसो रबाडा हा सध्याच्या घडीला जगातील सर्वाोत्कृष्ट गोलंदाजांपैकी एक आहे. त्याच्या गोलंदाजीवर खेळणं अनेक फलंदाजांना जड जातं. परंतु सूर्यकुमारने रबाडाच्या गोलंदाजीवर चेंडू फ्लिक करुन षटकार ठोकला. त्याचा तो फटका पाहून मी शॉक झालो. त्याचवेळी माझ्या मनात आलं की, हा खेळाडू टीम इंडियामध्ये असायला हवा.

आयपीएलमध्ये दबदबा

सूर्यकुमार यादवने यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी खेळताना सात सामन्यांमध्ये 28.85 च्या सरासरीने 233 धावा फटकावल्या आहेत. यादरम्यान त्याने 33 चौकार आणि 4 षटकार ठोकले आहेत. या धावा त्याने 155.33 च्या स्ट्राईक रेटने जमवल्या आहेत. 79 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. आयपीएलच्या मागील मोसमात सूर्यकुमारने 16 सामन्यांमध्ये 424 धावा फटकावल्या होत्या. 2018 च्या आयपीएलमध्ये त्याने 14 सामन्यांमध्ये 512 धावा फटकावल्या होत्या.

देशांतर्गत क्रिकेटमध्येही सूर्य तळपला

30 वर्षीय सूर्यकुमार यादवने देशांतर्गत क्रिकेटमध्येदेखील (Domestic cricket) उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. 77 प्रथम श्रेणी सामन्यांमद्ये त्याने 44 पेक्षा जास्त सरासरीने 5326 धावा फटकावल्या आहेत. यात 14 शतकं आणि 26 अर्धशतकांचा समावेश आहे. 93 लिस्ट ए सामन्यांमध्ये त्याने 35.46 च्या सरासरीने 2447 धावा फटकावल्या आहेत. यात 2 शतकं आणि 15 अर्धशतकांचा समावेश आहे. टी-20 क्रिकेटमध्ये सूर्यकुमार यादवचा जलवा पाहायला मिळाला आहे. 156 टी-20 सामन्यांमध्ये त्याने 31.81 च्या सरासरीने आणि 140 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने 3245 धावा फटकावल्या आहेत.

संबंधित बातम्या

IPL 2020 mid-season transfer | ‘या’ नियमानुसार आयपीएलमध्ये खेळाडूंची अदलाबदल करता येणार

Chris Gayle | युनिव्हर्सल बॉस’ ख्रिस गेल रुग्णालयात, बेडवरुन चाहत्यांना खास संदेश

IPL 2020 | मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर दिल्लीला दुहेरी झटका, ‘हा’ आक्रमक खेळाडू दुखापतीमुळे सामन्यांना मुकणार

(before the end of 2020 Suryakumar Yadav will be a part of Indian team says Aakash Chopra)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें