AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chris Gayle | युनिव्हर्सल बॉस’ ख्रिस गेल रुग्णालयात, बेडवरुन चाहत्यांना खास संदेश

किंग्जस इलेव्हन पंजाबचा फलंदाज ख्रिस गेलने स्वत:चा हॉस्पीटलमधील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. (Universal Boss Chris Gayle Hospitalized)

Chris Gayle | युनिव्हर्सल बॉस' ख्रिस गेल रुग्णालयात, बेडवरुन चाहत्यांना खास संदेश
| Updated on: Oct 12, 2020 | 6:00 PM
Share

दुबई : किंग्जस इलेव्हन पंजाबला (Kings Eleven Punjab) आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020) मोसमात चमकदार कामगिरी करता आलेली नाही. पंजाबने यंदाच्या मोसमात आतापर्यंत 7 सामने खेळले आहेत. यापैकी फक्त एकाच सामन्यात पंजाबला विजय मिळवता आला आहे. तर उर्वरित 6 सामन्यात पंजाबचा पराभव झाला आहे. एकाबाजूला हारकिरी सुरु असताना पंजाबला मोठा धक्का लागला आहे. पंजाबचा स्टार फलंदाज ख्रिस गेल (Chris Gayle) रुग्णालयात दाखल झाला आहे. ख्रिस गेलने स्वत: याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे पंजाबसाठी हा मोठा धक्का समजला जात आहे. (Universal Boss Chris Gayle Hospitalized)

https://www.instagram.com/p/CGK9-9XF7oa/

गेलने स्वत:चा हॉस्पीटलमधील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये गेल आडवा पडला आहे. या फोटोत गेलच्या दोन्ही डोळ्यांवर काकडीचे गोल आकाराचे तुकडे ठेवले आहेत. तर एका हातात ग्लास धरलेला पाहायला मिळत आहे. गेलने या इंस्टाग्राम पोस्टमधून आपल्या चाहत्यांना संदेश दिला आहे.

काय म्हणाला गेल ?

“मी कधीच माघार घेणार नाही. मी यूनिव्हर्सल बॉस आहे. आणि हे सत्य बदलणार नाही. मी ज्या गोष्टी करतो, त्या सर्वच गोष्टींचं अनुकरण करु नका. पण एक सांगेन, माझी स्टाईल विसरु नका”, असं गेलने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच गेलची प्रकृती स्थिर नसल्याची माहिती पंजाबचा प्रशिक्षक अनिल कुंबळेने दिली होती. गेलला अन्नातून विषबाधा झाली. या विषबाधेमुळे गेलची तब्येत ठीक नाही, अशी माहिती कुंबळेने दिली होती.

गेलची आयपीएल कारकिर्द

ख्रिस गेल हा आयपीएलमधील यशस्वी खेळाडू राहिला आहे. गेलने आतापर्यंत आयपीएलमध्ये 125 सामने खेळले आहेत. यात गेलने 151 च्या स्ट्राईक रेटने 4 हजार 484 धावा केल्या आहेत. यामध्ये गेलने 6 शतकं तर 28 अर्धशतकं लगावली आहेत. गेलची नाबाद 175 ही सर्वोच्च धावसंख्या आहे. तसेच गेलने गोलंदाजी करताना 18 विकेट्स घेतल्या आहेत. गेल त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. गेलला युनिव्हर्स बॉस म्हटलं जातं.

संबंधित बातम्या :

Chris Gayle | रुग्णालयातही ख्रिस गेलचा स्वॅग… हटके अंदाजात फोटो शेअर

….म्हणून युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल अजून मैदानात उतरला नाही, कोच अनिल कुबंळेचा खुलासा

(Universal Boss Chris Gayle Hospitalized)

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...