….म्हणून युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल अजून मैदानात उतरला नाही, कोच अनिल कुबंळेचा खुलासा

किंग्जस इलेव्हन पंजाबचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेल हा आयपीएलमधील यशस्वी खेळाडू राहिला आहे. (Universe Boss Chris Gayle's Health Unstable)

....म्हणून युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल अजून मैदानात उतरला नाही, कोच अनिल कुबंळेचा खुलासा
Follow us
| Updated on: Oct 09, 2020 | 7:12 PM

दुबई : आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020) मोसमातील 22 व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) किंग्ज इलेव्हन पंजाबचा (Kings Eleven Punab) 69 धावांनी पराभव केला. या सामन्यात पंजाबचा आक्रमक फलंदाज युनिव्हर्स बॉस (Universe Boss) अर्थात ख्रिस गेल (Chris Gayle) खेळण्याची दाट शक्यता होती. मात्र गेलला पंजाबच्या अंतिम 11 खेळाडूंमध्ये स्थान देण्यात आलं नाही. पंजाबची एका बाजूला हारकिरी सुरु आहे. त्यानंतरही गेलला खेळण्याची संधी का दिली जात नाही, असा सवाल पंजाबच्या समर्थकांकडून उपस्थित केला जातोय. मात्र गेलला अंतिम 11 खेळाडूंमध्ये न खेळवण्याबाबत पंजाबचा कोच अनिल कुंबळेने खुलासा केला आहे. (Universe Boss Chris Gayle’s Health Unstable)

कुंबळे काय म्हणाला ?

हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात ख्रिस गेलचं खेळणं अपेक्षित होतं. मात्र त्याला अंतिम 11 मध्ये स्थान न दिल्यामागचं कारण अनिल कुंबळेने सांगितलं आहे. “ख्रिस गेलची प्रकृती स्थिर नसल्याने त्याला हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात खेळता आले नाही, असं कुंबळे म्हणाला. ख्रिसला गेल्या काही दिवसांआधी फुड पॉईझनचा त्रास झाला. या फुड पॉईझनिंगमुळे गेलची प्रकृती स्थिर नाही”, अशी माहिती कुंबळेने दिली. पंजाबमध्ये गेलला ग्लेन मॅक्सवेलच्या जागी स्थान देण्यात येणार होते. ग्लेन मॅक्सवेल यंदाच्या मोसमात सातत्याने निराशाजनक कामगिरी करतोय.

गेलची आयपीएल कारकिर्द

ख्रिस गेल हा आयपीएलमधील यशस्वी खेळाडू राहिला आहे. गेलने आतापर्यंत आयपीएलमध्ये 125 सामने खेळले आहेत. यात गेलने 151 च्या स्ट्राईक रेटने 4 हजार 484 धावा केल्या आहेत. यामध्ये गेलने 6 शतकं तर 28 अर्धशतकं लगावली आहेत. गेलची नाबाद 175 ही सर्वोच्च धावसंख्या आहे. तसेच गेलने गोलंदाजी करताना 18 विकेट्स घेतल्या आहेत. गेल त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. गेलला युनिव्हर्स बॉस म्हटलं जातं.

सलामी जोडी यशस्वी, पंजाब अयशस्वी

या हंगामाच्या सुरुवातीपासून पंजाबचे सलामीवीर सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत. कर्णधार लोकेश राहुल आणि मयंक अगरवाल दोघेही सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आहेत. मात्र पंजाबला आतापर्यंत चमक दाखवता आली नाहीये. पंजाबने यंदाच्या मोसमात 6 सामने खेळले आहेत. यापैकी 5 सामन्यात पंजाबचा पराभव झाला आहे. तर फक्त 1 सामनाच जिंकता आला आहे. पंजाब 2 पॉइंट्ससह पॉइंट्सटेबलमध्ये 8 व्या क्रमांकावर आहे. दरम्यान पंजाब या हंगामातील पुढील सामना 10 ऑक्टोबरला कोलकातविरुद्ध खेळणार आहे.

संबंधित बातम्या :

IPL 2020, RR VS DC Live : राजस्थान रॉयल्ससमोर तगड्या दिल्ली कॅपिटल्सचे आव्हान

Virendra Sehwag | चेन्नईला सरकारी नोकरी समजलेत, वीरेंद्र सेहवागची केदार जाधव-रवींद्र जडेजावर खरमरीत टीका

(Universe Boss Chris Gayle’s Health Unstable)

Non Stop LIVE Update
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.