shweta  Tiwari’ माझ्या लग्न या गोष्टीवरून विश्वास उडालाय’ म्हणत अभिनेत्री श्वेता तिवारीने मुलगी पलकला लग्नाबाबत दिला मोठा सल्ला

प्रत्येक लग्न वाईट नसते. माझे अनेक मित्र आहेत. जे लग्न करून आनंदी आहेत आणि मी त्यांच्यासाठी आनंदी आहे. पण मी माझ्या अनेक मैत्रिणींनाही लग्न कवळ जबरदस्तीनं पुढे नेताना दिसतात.

shweta  Tiwari माझ्या लग्न या गोष्टीवरून विश्वास उडालाय म्हणत अभिनेत्री श्वेता तिवारीने मुलगी पलकला लग्नाबाबत दिला मोठा सल्ला
Shweta Tiwari
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 11, 2022 | 4:09 PM

अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta  Tiwari )आपल्या अभिनयाबरोबरच खासगी आयुष्यामुळंही चर्चेत असलेली दिसून येते . श्वेता आता दोन वर्षाच्या मोठया ब्रेकनंतर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दिसून येणार आहे. ‘मेरे बाप की दुल्हन’ या टीव्ही शोमध्ये (TV Show)अखेरची दिसलेली होती. मी हूं अपराजिता या टीव्ही शोसह परत येणार आहे. शोबद्दलच्या संभाषणादरम्यान, श्वेता तिवारीने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलच्या ( personal life)सर्व प्रश्नांची उत्तरे देखील दिली. आहेत. श्वेता तिवारीला आज लग्नाबद्दल तिचे काय विचार आहेत असे विचारले असता, श्वेता तिवारी स्पष्टपणे म्हणाली, ‘माझा लग्नावर विश्वास नाही. मी माझ्या मुलीलाही लग्न करू नकोस असे सांगते.

निर्णय घेण्यापूर्वी विचार कर

श्वेता तिवारी म्हणाली, ‘हे तिचे आयुष्य आहे आणि ते कसे जगायचे हे मी तिला सांगण्याची अजिबात गरज नाही. श्वेता तिवारी म्हणाली- आयुष्यात लग्न करणं खूप गरजेचं आहे आणि लग्नाशिवाय आयुष्य कसं जाईल असं नसावं. प्रत्येक लग्न वाईट नसते. माझे अनेक मित्र आहेत. जे लग्न करून आनंदी आहेत आणि मी त्यांच्यासाठी आनंदी आहे. पण मी माझ्या अनेक मैत्रिणींनाही लग्न कवळ जबरदस्तीनं पुढे नेताना दिसतात. ते त्यांच्यासाठी आणि त्यांच्या मुलांसाठी चांगले नाही. म्हणूनच मी माझ्या मुलीला समजावून सांग  की, तिला जे आनंदी वाटेल ते तिने करावे, पण सामाजिक दबावाखाली कोणतेही काम करू नका. श्वेता तिवारी म्हणाली की ती कधीही जोडीदाराची उणीव भासत नाही.