AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वरुण धवन आणि नताशा दलालच्या लग्नाची नवी तारीख समोर, स्थळंही ठरलं!

गेल्या काही दिवसांपासून हे दोघेही विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. (Varun Dhawan Natasha Dalal Marriage Date)

वरुण धवन आणि नताशा दलालच्या लग्नाची नवी तारीख समोर, स्थळंही ठरलं!
| Updated on: Jan 15, 2021 | 9:52 PM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) आणि फॅशन डिझायनर नताशा दलाल (Natasha Dalal) हे दोघेही रिलेशनशिप आहेत. हे दोघेही प्रत्येक कार्यक्रमांना एकत्र हजेरी लावतात. गेल्या काही दिवसांपासून हे दोघेही विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. नुकतंच या दोघांच्या लग्नाची एक नवीन तारीख समोर आली आहे. (Varun Dhawan Natasha Dalal to get married on 24 January)

येत्या 24 जानेवारीला वरुण धवन आणि नताशा दलाल विवाहबंधनात अडकणार आहे. वरुण धवन यांचे वडील आणि चित्रपट दिग्दर्शक डेव्हिड धवन यांच्या एका जवळच्या मित्राने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

बॉलिवूड हंगामा या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, डेव्हिड धवन यांच्या एका जवळच्या मित्राने वरुण धवनच्या लग्नाच्या तारीख ठरल्याची माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून मला अनेक पत्रकारांनी वरुणच्या लग्नाच्या तारखेबद्दल विचारण्यासाठी फोन केला होता. मी त्यांनी ही अफवा असल्याचे सांगितले होते. मात्र मी तुमच्याशी खोटं बोलू शकत नाही. वरुणने कुली नं 1 या चित्रपटानंतर लग्नाचा निर्णय घेतला होता, असे ते म्हणाले.

वरुण धवन आणि नताशा दलाल हे दोघेही येत्या 24 जानेवारीला विवाहबंधनात अडकणार आहेत. अलिबागमध्ये हा विवाहसोहळा पार पडेल. कोरोना कायम राहणार आहे. त्यामुळे अजून किती वेळ वाट पाहणार, असेही त्यांनी सांगितले.

लॉकडाऊननंतर अनेकजण धुमधडाक्यात लग्न करत आहे. पण वरुण आणि नताशा असे करु शकत नाही. जर त्यांच्या लग्नात 50 हून अधिक पाहुणे उपस्थित राहिले, तर ते अडचणीत येतील. त्यामुळे या लग्नात केवळ जवळचे नातेवाईक उपस्थित असणार आहे.

कोण आहे नताशा दलाल?

नताशा दलाल एक प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. तिने आतापर्यंत अनेक बॉलिवूडमधील सेलेब्रिटींसाठी ड्रेस डिझाईन केले आहेत. तसेच वरुण धवन आणि नताशा लहापणापासूनचे मित्र आहेत. नताशाने न्यूयॉर्कमधून फॅशन डिझाईनिंगचे शिक्षण घेतले आहे. सध्या ती मुंबईत आई -वडिलांसोबत राहते. नताशाचे वडील उद्योगपती असून आई गृहिणी आहे. विशेष म्हणजे नताशाचा आवडता अभिनेताही वरुण धवन आहे. तसेच ती स्केच आणि डॉग लव्हर आहे. (Varun Dhawan Natasha Dalal to get married on 24 January)

संबंधित बातम्या :

कोरोनाचा बॉलिवूडला विळखा, आयफा सोहळा पुढे ढकलला, वरुण धवनचं विवाहस्थळ बदलणार?

वरुण धवन आणि नताशा दलालच्या लग्नाची तारीख ठरली?

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.