वरुण धवन आणि नताशा दलालच्या लग्नाची तारीख ठरली?

मुंबई: बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि फॅशन डिझायनर नताशा दलाल अनेक महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघांना नेहमी प्रत्येक कार्यक्रमात एकत्र पाहिले जाते. मात्र आता दोघे लवकरच लग्नाबंधनात अडकणार असल्याचं सांगितलं जात आहे. वरुण-नताशा नोव्हेंबर 2019 पर्यंत लग्न करणार असल्याची चर्चा आहे. नुकतेच एका मॅग्झीनच्या मुलाखतीमध्ये वरुणने नताशासोबतच्या रिलेशनशिपबद्दल कबुली दिली. याशिवाय दिग्दर्शक करण जोहरचा चॅट शो …

, वरुण धवन आणि नताशा दलालच्या लग्नाची तारीख ठरली?

मुंबई: बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि फॅशन डिझायनर नताशा दलाल अनेक महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघांना नेहमी प्रत्येक कार्यक्रमात एकत्र पाहिले जाते. मात्र आता दोघे लवकरच लग्नाबंधनात अडकणार असल्याचं सांगितलं जात आहे. वरुण-नताशा नोव्हेंबर 2019 पर्यंत लग्न करणार असल्याची चर्चा आहे.

नुकतेच एका मॅग्झीनच्या मुलाखतीमध्ये वरुणने नताशासोबतच्या रिलेशनशिपबद्दल कबुली दिली. याशिवाय दिग्दर्शक करण जोहरचा चॅट शो ‘कॉफी विथ करण’मध्ये वरुणने नताशासोबत मी लग्नाचा प्लॅन करत आहे, असं सांगितलं होतं. यानंतर वरुण आणि नताशा नोव्हेंबर 2019 मध्ये लग्न करणार असल्याची चर्चा सुरु झाली. मात्र वरुण धवनने हे वृत्त फेटाळले आहे.

पिंकविलाच्या वृत्तानुसार, वरुण धवनला नोव्हेंबर 2019 मध्ये नताशासोबत लग्न करणार आहेस का? असं विचारण्यात आलं. यावर वरुणने ही माहिती चुकीची असल्याचं सांगितले.

करण जोहरच्या शोमध्ये करण जोहरने वरुण आणि नताशाला ‘हॅपी फ्रेंड’ असं म्हटले होतं. यावर वरुणने आम्ही हॅपी फ्रेंड नसून आम्ही ‘हॅपी कपल’ आहोत असं उत्तर दिले होते. “मी नताशासोबत डेट करत आहे. आम्ही कपल आहे. मी नताशासोबत लग्न करण्याचा विचार करतोय”, असं वरुण म्हणाला होता.

जेव्हा करणने वरुणला विचारले तू लग्न कधी करणार आहेस? यावर वरुण म्हणाला, मी कोणत्या सेलेब्रिटी कपलसोबत स्पर्धा करत नाही.

सध्या वरुण आपल्या अगामी ‘कलंक’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यामध्ये आलिया भटसह, माधुरी दीक्षित नेने, संजय दत्त, वरुण धवन, आदित्य रॉय कपूर आणि सोनाक्षी सिन्हा यासारखे अभिनेते प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय वरुण लवकरच रेमो डिसूजाच्या ‘एबीसीडी 3’ चित्रपटाचं शूटिंग सुरु करणार आहे.

कोण आहे नताशा दलाल?

नताशा दलाल एक प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. तिने आतापर्यंत अनेक बॉलिवूडमधील सेलेब्रिटींसाठी ड्रेस डिझाईन केले आहेत. तसेच वरुण धवन आणि नताशा लहापणापासूनचे मित्र आहेत. नताशाने न्यूयॉर्कमधून फॅशन डिझाईनिंगचे शिक्षण घेतले आहे. सध्या ती मुंबईत आई -वडिलांसोबत राहते. नताशाचे वडील उद्योगपती असून आई गृहिणी आहे. विशेष म्हणजे नताशाचा आवडता अभिनेताही वरुण धवन आहे. तसेच ती स्केच आणि डॉग लव्हर आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *