AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ना बेड, ना सोफा, ना डायनिंग टेबल! सुशांत सिंह राजपूतच्या घरात असं आयुष्य जगतेय अदा शर्मा; म्हणाली, ‘एकतर उभं राहा किंवा पाय…’

Adah Sharma Home: अदा शर्माच्या घरातील साधेपणामुळे पुन्हा एकदा आलिशान जीवनशैलीच्या व्याख्येवर चर्चा सुरू झाली आहे. महागड्या वस्तूंपेक्षा मोकळी जागा आणि स्वतःच्या आवडीनुसार जगणं अधिक महत्त्वाचं असू शकतं, हे अदाच्या घरातून दिसून येतं.

ना बेड, ना सोफा, ना डायनिंग टेबल! सुशांत सिंह राजपूतच्या घरात असं आयुष्य जगतेय अदा शर्मा; म्हणाली, 'एकतर उभं राहा किंवा पाय...'
Adah Sharma homeImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 14, 2026 | 11:38 AM
Share

‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटातून चर्चेत आलेली अभिनेत्री अदा शर्मा सध्या तिच्या अनोख्या जीवनशैलीमुळे चर्चेत आहे. बॉलिवूडमध्ये आलिशान घरं, महागडं फर्निचर आणि आकर्षक इंटेरिअरसाठी कलाकार ओळखले जातात. मात्र, अदा शर्माच्या मुंबईतील घरात चक्क बेड, सोफा आणि डायनिंग टेबलच नाही. विशेष म्हणजे, हे घर दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचं पूर्वीचं निवासस्थान आहे. आपल्या घरातील साधेपणाबद्दल बोलताना अदाने केलेली टिप्पणी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

बेड, सोफा, डायनिंग टेबलशिवाय कसं राहते अदा शर्मा?

अदा शर्माने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आपल्या घरातील फर्निचरविषयी खुलासा केला. तिच्या घरात झोपण्यासाठी बेड, बसण्यासाठी सोफा किंवा जेवणासाठी डायनिंग टेबल नाही. तिच्या मते, भौतिक वस्तूंशी फारशी आसक्ती ठेवण्याची तिला इच्छा नाही. त्यामुळे घर सजवताना तिने पारंपरिक फर्निचरला महत्त्व दिलेलं नाही. याविषयी बोलताना अदा म्हणाली की, तिच्या घरी येणाऱ्या पाहुण्यांना एकतर उभं राहावं लागेल किंवा पायांचे स्नायू मजबूत करावे लागतील. तिच्या या मजेशीर विधानामुळे तिच्या घरातील अनोख्या व्यवस्थेची चर्चा रंगली आहे.

बेड न घेण्यामागचं कारणही खास

अदा शर्माने बेड न घेण्यामागचं कारण सांगताना भौतिक वस्तूंशी जास्त गुंतून न राहण्याची भूमिका मांडली. तिच्या मते, नातेसंबंध आधीच गुंतागुंतीचे असतात, त्यामुळे फर्निचरशी आणखी आसक्ती कशाला? जमिनीवर झोपल्याने संपूर्ण जमिनीची जागा वापरता येते आणि मोठ्या बेडपेक्षाही अधिक मोकळीक मिळते, असं ती गंमतीने म्हणाली. अनेक कलाकार घराच्या सजावटीवर मोठ्या प्रमाणात खर्च करतात. मात्र, अदा स्वतःच्या आवडीनुसार घरातील मोकळ्या जागेला अधिक महत्त्व देते.

सुशांत सिंह राजपूतच्या घरात राहतेय अभिनेत्री

अदा शर्मा मुंबईतील ज्या घरात राहते, ते एकेकाळी दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचं निवासस्थान होतं. सुशांतच्या निधनानंतर हे घर काही काळ रिकामं होतं. त्यानंतर अदाने हे घर भाडेतत्त्वावर घेतलं. ऑक्टोबर 2023 मध्ये तिने या मालमत्तेसाठी पाच वर्षांचा भाडेकरार केल्याचं वृत्त आहे. हे घर तिने विकत घेतलेलं नसून ती तिथे भाड्याने राहते. या घराची रचना आणि सजावटही तिच्या आवडीनुसार करण्यात आली आहे. घरात पांढऱ्या भिंती, प्रार्थनेसाठी स्वतंत्र खोली, टेरेस गार्डन, संगीताचा सराव करण्यासाठी जागा आणि डान्स स्टुडिओ आहे. फर्निचर कमी असलं, तरी स्वतःच्या आवडीनिवडींसाठी आवश्यक जागा तिने निर्माण केली आहे.

Follow Us
मोठी बातमी! एअर इंडियाच्या विमानाला हायजॅक अलर्ट, जयपूरमध्ये इमर्जन्सी
मोठी बातमी! एअर इंडियाच्या विमानाला हायजॅक अलर्ट, जयपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग; नेमकं काय घडलं?
संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'हे घुसखोरांचं सरकार..
Sanjay Raut : संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'हे घुसखोरांचं सरकार...
जंतरमंतर आंदोलन प्रकरणी CJP च्या अजिंक्य शिंदेला अटक; दिल्ली पोलिस...
जंतरमंतर आंदोलन प्रकरणी CJP च्या अजिंक्य शिंदेला अटक; दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर अभिजीत दीपकेंचा संताप
दीड किलोमीटरमध्ये 8 हजार लोकांची गर्दी म्हणजे... जंतर मंतरवरील आंदोलना
दीड किलोमीटरमध्ये 8 हजार लोकांची गर्दी म्हणजे... जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत अमित शहांचं मोठं विधान
एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर हालचालींना वेग, नंदनवनवरील बैठकीत...
एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर हालचालींना वेग, नंदनवनवरील बैठकीत महत्त्वाची चर्चा? उदय सामंत म्हणाले...
अभिजीत दीपकेंनी नागपूर पोलिसांकडून सुरक्षा नाकारली, अचानक...
अभिजीत दीपकेंनी नागपूर पोलिसांकडून सुरक्षा नाकारली, अचानक... मोठं कारण समोर
दुर्गा पूजेसाठी जात असताना भयंकर घडलं; ममता बॅनर्जींना थेट...
दुर्गा पूजेसाठी जात असताना भयंकर घडलं; ममता बॅनर्जींना थेट... मद्यधुंद महिलेचा धक्कादायक कारनामा
मोठी दुर्घटना टळली! डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवासी लिफ्ट मधेच अडकली,
मोठी दुर्घटना टळली! डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवासी लिफ्ट मधेच अडकली, 15 मिनिटांसाठी....
My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर...
गोल्डनंतर आता प्लॅटिनम अवॉर्ड; My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर
महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती
Mahayuti : Eknath Shinde : महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती, नेमकं कारण काय?