AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्याने आधी गालावर किस केलं ओठांना स्पर्श केला आणि… म्हणाली वडील असंच करतात

Bollywood Actress Life : वडिलांच्या निधनानंतर डान्स टिचरने 6 वर्षे केलं लैंगिक शोषण, अभिनेत्री कशी केली त्यांच्या तावडीतून स्वतःची सुटका... म्हणाली..., अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असते चर्चेत...

त्याने आधी गालावर किस केलं ओठांना स्पर्श केला आणि... म्हणाली वडील असंच करतात
फाईल फोटो
| Updated on: Oct 25, 2025 | 3:34 PM
Share

Bollywood Actress Life : बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहर याच्या ‘रॉकी और राणी की प्रेम कहानी’ सिनेमातून प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री अंजली आनंद हिने एका कार्यक्रमात स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. वडिलांच्या निधनानंतर स्वतःवर आलेल्या संकटाबद्दल अभिनेत्रीने धक्कादायक खुलासा केला आहे. अभिनेत्री लहान असताना तिच्यावर डान्स टिचरने अत्याचार केले…

अंजलीने उघड केले की लहानपणी तिच्या डान्स टीचरने तिचं लैंगिक शोषण केलं होतं. हा छळ सुमारे सहा वर्षे चालला. अभिनेत्री म्हणाली, ‘मी आठ वर्षांची होती आणि ही घटना माझ्या वडीलांचं निधन झाल्यानंतर घडली. टीचर मला कायम म्हणायचा, मी तुझा बाप आहे… मी देखील त्याच्यावर विश्वास ठेवला कारण मला महिती नव्हतं… त्यानंतर त्याने हळू – हळू वाईट प्रकार करण्यास सुरुवात केली. आधी माझ्या गालावर त्याने किस केलं. त्यानंतर ओठांना स्पर्श केला… कायम म्हणायचा मी तुझा वडील आहे आणि वडील असंच करतात… मला नव्हतं माहिती बाप – लेकीचं नातं कसं असतं… मी जे काही मागायची तो मला द्यायचा…’

माझ्या प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवायचा…

अंजली पॉडकास्टमध्ये म्हणाली, ‘टीचरने माझ्या आयुष्यावर नियंत्रण करण्यास सुरुवात केली. तो मला मुलींसारखे कपडे घालू देत नव्हता किंवा केस मोकळे ठेवू देत नव्हता. त्याला माझ्याकडे कोणीही आकर्षित व्हावं असं वाटत नव्हतं. तो माझे मेसेज आणि प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवायचा… मला शाळेतून घ्यायला यायचा… मी बाहेर जाऊ नये म्हणून ट्यूशन टीचरला देखील घरी बोलवायचा… तो सगळीकडे का आहे याचा सर्वांनाच प्रश्न पडायचा, पण कोणीही त्याचं कारण शोधण्याचा प्रयत्न केला नाही. ‘

पहिल्या बॉयफ्रेंडमुळे त्याच्यापासून झाली सुटका…

अंजली हिने सांगितल्यानुसार, जेव्हा तिच्या बहिणीचं लग्न झालं तेव्हा तिची भेट तिच्या वडिलांच्या मित्राच्या मुलासोबत झाली. त्यानंतर पहिल्या भेटीचं रुपांतर मैत्रीत आणि त्यानंतर प्रेमात झालं. अभिनेत्री म्हणाली, ‘दोन वर्ष आम्ही एकमेकांना डेट केलं… माझ्या पहिला बॉयफ्रेंडने माझी टीचरच्या तावडीतून सुटका केली. ब्रेकअपनंतर मी त्याच्यासोबत चालायला गेली… तेव्हा मी त्याला सर्वकाही सांगितलं आणि त्याचे आभार मानले…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

Follow Us
सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी द्या, बड्या नेत्याच्या मागणी
सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी द्या, बड्या नेत्याच्या मागणीने राजकीय वर्तुळात खळबळ!
एकच खळबळ! मुंबई लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; थेट पोलिसांवर
एकच खळबळ! मुंबई लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; थेट पोलिसांवरच उगारला चाकू, पुढे...
आगामी मुख्यमंत्री कोण होणार? चर्चांदरम्यानच राष्ट्रवादीतील नेत्याचं
आगामी मुख्यमंत्री कोण होणार? चर्चांदरम्यानच राष्ट्रवादीतील नेत्याचं फडणवीसांबाबत मोठं विधान, थेट...
पावसाने दिला दगा! 50 हजार खर्च करूनही परळीत सोयाबीनने टाकल्या माना
Beed | पावसाने दिला दगा! 50 हजार खर्च करूनही परळीत सोयाबीनने टाकल्या माना; शेतकरी हवालदिल
बुलढाण्याने पांघरला हिरवा शालू! पर्वतरांगांचं मनमोहक रूप पहाच
Buldhana | बुलढाण्याने पांघरला हिरवा शालू! सह्याद्री-अजिंठा पर्वतरांगांचं मनमोहक रूप पहाच
शरद पवारांचे फोटो पुन्हा राष्ट्रवादीच्या बॅनरवर झळकणार? परवानगी
NCP Banner | शरद पवारांचे फोटो पुन्हा राष्ट्रवादीच्या बॅनरवर झळकणार? परवानगी अन्... राजकीय चर्चांना उधाण
आधी मकोका, मगच अंत्यसंस्कार! युवकाच्या मृत्यूनंतर श्रीरामपूरमध्ये....
Shrirampur Crime Case | आधी मकोका, मगच अंत्यसंस्कार! युवकाच्या मृत्यूनंतर श्रीरामपूरमध्ये मृतदेहासह पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन
मध्य रेल्वेचा खोळंबा! मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड; लोकलसह....
Asangaon to Vasind | मध्य रेल्वेचा खोळंबा! मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड; लोकलसह एक्स्प्रेस गाड्या अर्धा तास रांगेत
री-डेव्हलपमेंटचा बेफिकीर खेळ! भर रस्त्यात कोसळली इमारत; खिडकीतून...
Kalyan Collapsed Building | री-डेव्हलपमेंटचा बेफिकीर खेळ! भर रस्त्यात कोसळली इमारत; खिडकीतून उडी मारून...
मोठी बातमी! ठाकरेंच्या गटातील नगरसेविका शिंदे सेनेच्या वाटेवर? राजकीय
मोठी बातमी! ठाकरेंच्या गटातील नगरसेविका शिंदे सेनेच्या वाटेवर? राजकीय घडामोडींना वेग