
हार्दिक आणि नताशा यांनी अखेर विभक्त झाल्याचं जाहीर केलं आहे. दोघांनी एक ज्वॉईंट स्टेटमंट शेअर करत याबाबत सगळ्यांना माहिती दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु होत्या. अखेर ती गोष्ट खरी ठरली आहे. दोघांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतलाय. हार्दिक आणि नताशा यांच्या विभक्त होण्याच्या निर्णयाने अनेकांना धक्का बसला आहे. दोघांना एक मुलगा आहे. त्यामुळे मुलाबद्दल सगळे चिंता व्यक्त करत आहेत. घटस्फोटाची घोषणा करण्यापूर्वीत नताशा देश सोडून आपल्या घरी परतली आहे. नताशा ही सर्बियाची नागरिक आहे. त्यामुळे आता ती आपल्या देशात परतली आहे.
दोघांच्या विभक्त होण्याच्या बातम्या येत असतानाच आता बॉलिवूडचं आणखी एक कपल देखील चर्चेत आलं आहे. अर्जुन कपूर आणि मलायका हे देखील विभक्त झाल्याची चर्चा आहे. सोशल मीडियावर लोकं दोघांच्या नात्याबद्दल चर्चा करत आहेत. अर्जुन कपूर आणि मलायका गेले अनेक दिवस रिलेशनशिपमध्ये होते. पण आता दोघेही विभक्त झाल्याची चर्चा आहे.
अर्जुन कपूरने त्याच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिले की, पॉझिटिव्ह असण्याचा अर्थ गोष्टी सुरळीत होतील असा नाही तर याचा अर्थ असा आहे की गोष्टी कशाही असोत, तुम्ही ठीक आहेत. टर्न आऊट… अर्जुनची ही पोस्ट समोर येताच दोघांच्या रिलेशनशिपमध्ये काहीही सुरळीत नसल्याचं बोललं जात आहे. दोघेही एकमेकांना डेट करत आहेत, मात्र काही काळापासून त्यांच्या विभक्त होण्याच्या अफवांनी बाजार तापला आहे.
मलायका स्पेनला गेली होती. तेथून ती नुकतीच परतली आहे. ती मुलासोबत विमानतळावर दिसली, मात्र अर्जुनच्या या पोस्टमुळे या जोडप्याच्या चाहत्यांची चिंता वाढली आहे. सध्या लोकांना हार्दिक आणि नताशाच्या विभक्त होण्यावर विश्वास बसत नाही. त्यातच अर्जुनने पुन्हा अशी पोस्ट शेअर केली आहे ज्यामुळे चर्चाना उधाण आले आहे.
अर्जुनने काल देखील अशीच एक पोस्ट शेअर केली होती. मलायकाने तिच्या स्पेनमधील सुट्टीचे फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये एर मिस्ट्री मॅन दिसला होता. तो कोण आहे याबाबत आता चर्चा सुरु आहेत.
मलायकाच्या फोटोत ‘मिस्ट्री मॅन’ची झलक दिसताच अर्जुन आणि मलायकाच्या विभक्त होण्याची चर्चा सुरु झाली. अर्जुन किंवा मलायका या दोघांनीही या बातम्यांवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दोघांनीही या अफवांवर कोणतेही वक्तव्य केलेले नाही. आता दोघेही एकत्र आहेत की नाही हे येणारा काळच सांगेल. मात्र सध्या तरी ते वेगळे होणार असल्याची चर्चा आहे.