Delhi Singer Death : केके नंतर आणखी एका तरुण गायकाने घेतला जगाचा निरोप

| Updated on: Jun 02, 2022 | 11:57 PM

शैल सागरचे गेल्या वर्षी तीन अल्बव रिलीज झाले होते. बिफोर इट गोज, स्टिल आणि मिस्टर मोबाईल मॅन लाईव्ह या तीन अल्बमचा त्यात समावेश आहे. शैल सागरचं मिस्टर मोबाईल मॅन लाईव्ह हे गुरुग्रामच्या द पियानो मॅन जॅज क्लबमध्ये लाईव्ह शूट करण्यात आलं होतं.

Delhi Singer Death : केके नंतर आणखी एका तरुण गायकाने घेतला जगाचा निरोप
केके नंतर आणखी एका तरुण गायकाने घेतला जगाचा निरोप
Image Credit source: TV9
Follow us on

नवी दिल्ली : प्रसिद्ध गायक केके यांच्या निधनाला 24 तास उलटत नाहीत तोच बुधवारी आणखी एका दिल्ली स्थित तरुण गायका (Singer)ने या जगाचा निरोप घेतल्याची माहिती समोर येत आहे. शैल सागर (22) असे मयत गायकाचे नाव आहे. शैल सागर (Shail Sagar)चा मृत्यू (Death) नेमका कशामुळे झाला हे अद्याप कळू शकले नाही. शैल सागर याच्या जाण्याने पुन्हा एकदा संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. शैल सागर हा गायक, गीतकार, वादक होता. त्याचे गाण्याचे अल्बमही रिलीज झाले होते. ऐन उमेदीच्या काळात एका तरुण गायकाच्या अशा जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. शैलने इफ आय ट्रायड या गाण्यापासून आपल्या करिअरची सुरुवात केली होती.

गेल्या वर्षी तीन अल्बम रिलिज

शैल सागरचे गेल्या वर्षी तीन अल्बव रिलीज झाले होते. बिफोर इट गोज, स्टिल आणि मिस्टर मोबाईल मॅन लाईव्ह या तीन अल्बमचा त्यात समावेश आहे. शैल सागरचं मिस्टर मोबाईल मॅन लाईव्ह हे गुरुग्रामच्या द पियानो मॅन जॅज क्लबमध्ये लाईव्ह शूट करण्यात आलं होतं. सागरच्या जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. सोशल मीडियावर त्याच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला जात आहे.

भारतीय इनडिपेंडन्स म्युझिक शैल सागर खूप लोकप्रिय होता

शैल सागर हा भारतीय इनडिपेंडन्स म्युझिकमध्ये खूप लोकप्रिय होता. त्यांनी प्राइड नावाच्या एकॉस्टिकमधून पदार्पण केले. त्याने Spotify वर 40,000 हून अधिक गाणी गायली आहेत. 2021 मध्ये त्याचे तीन सिंगल रिलीज झाले आहेत. तो पियानो, गिटार आणि सॅक्सोफोन देखील वाजवतो. तो हंसराज कॉलेजच्या म्युझिक सोसायटीचा माजी उपाध्यक्षही होता. (After KK another young singer took leave of the world in delhi)

हे सुद्धा वाचा