AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐश्वर्या रायचं सुपरहिट गाणं, ज्यावर तिने केलेला डान्स, 27 वर्षांपूर्वीचा न पाहिलेला व्हिडीओ तुफान व्हायरल

ऐश्वर्या राय आणि अक्षय खन्नाचा 27 वर्षे जुना डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामधील त्यांच्या डान्सने चाहत्यांना वेड लावलं आहे.

ऐश्वर्या रायचं सुपरहिट गाणं, ज्यावर तिने केलेला डान्स, 27 वर्षांपूर्वीचा न पाहिलेला व्हिडीओ तुफान व्हायरल
| Updated on: Jun 08, 2026 | 1:07 PM
Share

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अक्षय खन्ना यांचा तब्बल 27 वर्षांपूर्वीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अमेरिकेतील मियामी येथे झालेल्या एका लाइव्ह स्टेज शोमधील हा व्हिडिओ असून, त्यामध्ये दोन्ही कलाकारांनी त्यांच्या गाजलेल्या Taal चित्रपटातील लोकप्रिय टायटल ट्रॅकवर दिलेला दमदार परफॉर्मन्स पुन्हा एकदा चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.

व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेक चाहत्यांनी 90 च्या दशकातील बॉलिवूडच्या सुवर्णकाळाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ऐश्वर्या रायचे मोहक व्यक्तिमत्त्व आणि अक्षय खन्नाचा उत्साही अंदाज पाहून नेटिझन्स जुन्या आठवणींमध्ये रमले आहेत.

मियामीच्या रंगमंचावर ‘ताल’ची जादू

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ 1999 सालातील असल्याचे सांगितले जाते. त्यावेळी ‘ताल’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला होता आणि चित्रपटाच्या प्रचारासाठी ऐश्वर्या राय व अक्षय खन्ना अमेरिकेतील मियामी येथे आयोजित करण्यात आलेल्या एका मोठ्या कॉन्सर्टमध्ये सहभागी झाले होते.

या व्हिडिओमध्ये ऐश्वर्या रायने पांढऱ्या रंगाचा आकर्षक पोशाख परिधान केला होता. तिचे सौंदर्य विशेष लक्ष वेधून घेत होते. तर दुसरीकडे अक्षय खन्ना पूर्ण जोशात नृत्य करताना दिसत आहे. दोघांमधील उत्कृष्ट समन्वय, स्टेजवरील ऊर्जा आणि आत्मविश्वासामुळे उपस्थित प्रेक्षक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले होते.

सोशल मीडियावर चाहत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

हा जुना व्हिडिओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाला. इंस्टाग्राम, एक्स (पूर्वीचे ट्विटर) आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाखो लोक हा व्हिडिओ शेअर करत आहेत.

‘ताल’ चित्रपटातील गाणी आजही संगीतप्रेमींच्या पसंतीची आहेत. त्यामुळे ऐश्वर्या आणि अक्षय यांना अनेक वर्षांनंतर अशा लाइव्ह परफॉर्मन्समध्ये पाहण्याची संधी मिळाल्याने चाहत्यांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by Raj (@thisisme__raj)

व्हिडिओमध्ये ऐश्वर्याच्या चेहऱ्यावरील भाव, त्यांची सहजता आणि नृत्यशैली यांचे विशेष कौतुक होत आहे. त्याचबरोबर अक्षय खन्नाचा स्टाइलिश अंदाज आणि नृत्यकौशल्यालाही चाहत्यांनी भरभरून दाद दिली आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमुळे एक गोष्ट पुन्हा अधोरेखित झाली आहे की, 90 च्या दशकातील बॉलिवूडचा काळ अनेकांच्या मनात आजही विशेष स्थान राखून आहे.

Follow Us
विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
Maharashtra MLC Election 2026 Voting : विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं....
Kolhapur : ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं कृत्य उघड, चुलत्यालाच दिला मोठा धक्का
ऐतिहासिक विक्रम! जिओच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
Jio Platforms IPO : ऐतिहासिक विक्रम! जिओ प्लॅटफोर्मच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; जरांगे रामदास कदमांवर भडकले
Manoj Jarange Patil : शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; मनोज जरांगे पाटील रामदास कदमांवर भडकले, नेमकं काय म्हणाले?
रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाड
Prasad Kadam : रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाडांचं सडेतोड उत्तर
समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगेवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
Ramdas Kadam : समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगे पाटलांवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट..
CM Devendra Fadnavis : अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट...
बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी..
Pune : बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी संबंधित व्यक्ती असल्याचा दावा, राजकीय वर्तुळात खळबळ
अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं...
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं प्रकरण काय?
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं...
Chhagan Bhujbal : 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा मोठा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं, तर…