Aishwarya Rai : सहकलाकारांसोबत अफेअर असल्याचा संशय घ्यायचा, म्हणूनच सलमान माझ्याशी…ऐश्वर्याचा तो दावा खरा? प्रसिद्ध अभिनेत्रीने गुपित फोडलं!

Salman Khan Aishwarya Rai Breakup : ऐश्वर्या रायनं सलमानसोबत ब्रेकअप केल्यानंतर त्याच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर सलमानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीनं सलमान आणि ऐश्वर्याच्या नात्याबद्दल खुलासा केला होता.

Aishwarya Rai : सहकलाकारांसोबत अफेअर असल्याचा संशय घ्यायचा, म्हणूनच सलमान माझ्याशी...ऐश्वर्याचा तो दावा खरा? प्रसिद्ध अभिनेत्रीने गुपित फोडलं!
| Updated on: Nov 12, 2026 | 8:21 PM

बॉलिवूड अभिनेत्री सोमी अली कायम चर्चेत असते. ती सलमान खान आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्याबद्दल सतत वक्तव्य करत असते. सोमी अलीनं एका मुलाखतीत सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्याबद्दल खुलासा केला आहे. तिनं सलमानच्या एक्स गर्लफ्रेंडबद्दल उघडपणे भाष्य केलं आहे. सोमी अली म्हणालेली की, सलमानने ऐश्वर्याच्या खांद्याचं हाड मोडलेलं.

काय म्हणालेली सोमी अली?

Loading...

सोमी अलीनं वृत्तसंस्था IANS शी सलमान खान आणि ऐश्वर्याच्या नात्याबद्दल संवाद साधला. या संभाषणात सोमी म्हणाली की, सलमाननं तिला जशी वागणूक दिली तशी त्यानं कोणालाही कधीच दिली नाही. तिनं ऐश्वर्या रायबद्दलही खुलासा केला, की, सलमाननं ऐश्वर्याला खूप वाईट वागणूक दिली. सलमानने ऐश्वर्याचं खांद्याचं हाडही मोडलं होतं. पण, अभिनेत्यानं कतरिनासोबत काय केलं याबद्दल तिला खात्री नाही.

दरम्यान, सलमान खान आणि ऐश्वर्याचं नातं वाईट पद्धतीनं संपलं. त्यांचं नातं आणि ब्रेकअप हे काही गुपित नाही. त्यांचं नातं वाईट पद्धतीने संपलं हे सर्वश्रुत आहे. 2002 मध्ये त्यांच्या ब्रेकअपच्या वेळी, ऐश्वर्यानं सलमानवर काही कठोर आरोप केले होते. सलमान खान आणि ऐश्वर्या राय बच्चन ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटाच्या सेटवर एकमेकांच्या जवळ आले. त्यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीचं खूप कौतुक झालं.

ब्रेकअपच्या वेळी सलमान आणि ऐश्वर्यामध्ये जोरदार वाद झाला होता. ऐश्वर्यानं सलमानवर मानसिक आणि शारीरिक छळाचे अनेक गंभीर आरोपही केले. इतकंच नाही तर, सलमानच्या दारूच्या व्यसनामुळे, शारीरिक छळामुळे ती वैतागली होती असाही आरोप होता. असं असूनही, ती त्याच्या पाठीशी उभी राहिली आणि त्या बदल्यात तिला फक्त दुःख आणि यातनाच मिळाल्या. ऐश्वर्या रायनं एका मुलाखतीत खुलासा केला. ती म्हणालेली की, ‘सलमानला नेहमीच संशय होता की, माझं माझ्या सहकलाकारांसोबत अफेअर आहे, म्हणूनच तो अनेकदा माझ्याशी शारीरिक जवळीक साधायचा. नात्यातील खरी अडचण तेव्हा सुरू होते, जेव्हा जोडीदार एकमेकांच्या प्रत्येक लहानसहान गोष्टीवर संशय घेऊ लागतात. अशा परिस्थितीत, जोडप्यांना केवळ एकत्र राहणंच कठीण होत नाही, तर ते एकमेकांनाही नापसंत करू लागतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us