‘स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय…’, ऐश्वर्या रायच्या नव्या पोस्टची सर्वत्र चर्चा

Aishwarya Rai Bachchan | 'स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय...', ऐश्वर्या राय बच्चन हिच्या नवीन सोशल मीडिया पोस्टची सर्वत्र चर्चा..., गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या तिच्या खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत आहे. आता देखील अभिनेत्री तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आली आहे... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ऐश्वर्या राय हिची चर्चा रंगली आहे.

'स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय...', ऐश्वर्या रायच्या नव्या पोस्टची सर्वत्र चर्चा
Follow us
| Updated on: Mar 19, 2024 | 2:40 PM

Aishwarya Rai Bachchan | अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai Bachchan) कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असलेली ऐश्वर्या आता बॉलिवूडमध्ये देखील सक्रिय नसते. पण खास क्षण सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. आता देखील ऐश्वर्या हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ऐश्वर्या राय हिच्या पोस्टची चर्चा रंगली आहे. चाहते अभिनेत्रीच्या पोस्टवर कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत.

ऐश्वर्या राय बच्चन वडील कृष्णराज राय यांच्या खूप जवळ होती. अभिनेत्री कायम वडिलांच्या आठवणी ताज्या करताना दिसते. अभिनेत्रीच्या वडिलांचं निधन 2017 मध्ये झालं. अभिनेत्री कायम वडिलांच्या आठवणीत फोटो पोस्ट करत असते. आता पुन्हा एकदा ऐश्वर्याने तिच्या वडिलांसाठी एक पोस्ट केली आहे.

हे सुद्धा वाचा

19 मार्च 2024 रोजी ऐश्वर्या रायच्या वडिलांची पुण्यतिथी आहे. यावेळी ‘माजी मिस वर्ल्ड’ने वडिलांच्या आठवणीत एक पोस्ट केली. अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिच्या वडिलांचा एक फोटो शेअर केला आहे. पहिला फोटो ऐश्वर्याच्या वडिलांच्या फोटो फ्रेमचा आहे. दुसऱ्या फोटोमध्ये ऐश्वर्याचे वडील नात आराध्या बच्चन हिचे लाड करताना दिसत आहेत.

खास फोटो पोस्ट करत ऐश्वर्या हिने भावूक कॅप्शन देखील लिहिलं आहे. ‘माझे प्रिय डॅडी आणि अज्जा… मी तुमच्यावर प्रचंड प्रेम करते… तुमच्या प्रार्थानांसाठी धन्यवाद…’ असं ऐश्वर्याने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. सध्या सोशल मीडियावर ऐश्वर्याची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. एवढंच नाहीतर, चाहते देखील अभिनेत्रीच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

ऐश्वर्याच्या पोस्टवर एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘ऐश्वर्याने घरात बसून स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय…’ यांसारख्या अनेक कमेंट ऐश्वर्याच्या सोशल मीडिया पोस्टवर करण्यात आल्या आहेत. सांगायचं झालं तर, गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.

काही दिवसांपासून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे. पण यावर दोघांनी देखील अधिकृत घोषणा केलेली नाही. शिवाय ऐश्वर्या हिने सासूबाई जया बच्चन यांच्यासोबत असलेल्या मदभेदांमुळे अभिनेत्रीने सासर सोडल्याची देखील चर्चा रंगली. पण यावर कोणीही अधिकृत वक्तव्य केलं नाही.

Non Stop LIVE Update
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.