AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वकाही उडवून देऊ… सलमान खान नाही तर ऐश्वर्याच्या ‘या’ एक्स-बॉयफ्रेंडला पाकिस्तानातून धमकी

Threat by Gangste from Pakistan | ऐश्वर्या राय हिचा एक्स - बॉयफ्रेंड सर्वत्र चर्चेत... त्याला मिळालीये पाकिस्तानातून जीवे मारण्याची धमकी, तो एक फोन कॉल आणि सर्वकाही उडवून देण्याची धमकी...,

सर्वकाही उडवून देऊ... सलमान खान नाही तर ऐश्वर्याच्या 'या' एक्स-बॉयफ्रेंडला पाकिस्तानातून धमकी
Vivek Oberoi
| Updated on: Nov 22, 2025 | 9:30 AM
Share

Threat by Gangste from Pakistan | बॉलिवूड सेलिब्रिटी कायम गँगस्टर आणि अंडरवर्ल्डच्या निशाण्यावर असतात. आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींवर हल्ला झाला आहे, तर अनेकांना जीवे मारण्याची धमकी देखील मिळाली आहे… आता देखील एका प्रसिद्ध अभिनेत्याने पाकिस्तानातून मिळालेल्या धमकीबद्दल मौन सोडलं आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नाही तर, अभिनेते विवेक ओबेरॉय आहे.. एक काळ असा होता जेव्हा विवेक अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्यासोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत होता. दरम्यान, नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्याने मिळालेल्या धमकीबद्दल सांगितलं आहे…

2009 मध्ये ‘कुर्बान’ सिनेमाची शुटिंग करत असताना विवेक ओबेरॉय याला फोन आलेला. तेव्हा अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होची… अमेरिकेत “कुर्बान” सिनेमाचं चित्रीकरण करत होतो तेव्हा मला एक फोन आला आणि माझ्या आंसरिंग मशीनवर धमकीचा मेसेज सोडला.

सुरुवातीला विवेक याने धमकीकडे फारसं लक्ष दिलं नाही… विवेक म्हणाला, ‘मी अमेरिकेतील स्थानिक अधिकाऱ्यांनाही या घटनेची तक्रार केली. खरं तर, स्थानिक प्रॉडक्शन टीमने मला सांगितलं की, धमकीची तक्रार करणं आवश्यक आहे. या सर्व प्रकरणाचा सामना करण्यासाठी मला अमेरिकेत एका वकीलाची नियुक्ती देखील करावी लागली.’

फोनवर मिळाली जीवे मारण्याची धमकी…

विवेक याने सांगितल्यानुसार, त्याठिकाणी पोलीस बोलवण्यात आली आणि चौकशी सुरु झाली… ‘मी पोलिसांना सांगितलं… मला माहिती नाही ते कोण आहेत… ते मला म्हणाले, सर्वकाही संपवू आणि उडवून देऊ… त्यानंतर पोलिसांनी नंबर ट्रेस केला तेव्हा कळलं की नंबर पाकिस्तानचा आहे… त्यानंतर मात्र मला भीती वाटू लागली…’

View this post on Instagram

A post shared by Vivek Oberoi (@vivekoberoi)

मुंबईत विवेकला मिळाली सिक्योरिटी

विवेक पुढे म्हणाला, ‘त्या फोननंतर मला माझ्या सुरक्षेची काळजी वाटू लागली…सुरुवातीला मला वाटलं नशेमध्ये कोणी केलं असेल… पण नंतर कुटुंब आणि माझ्या सुरक्षेसाठी मला सेक्योरिटी ठेवावी लागली… मी मुंबईत परतल्यावर पुन्हा धमक्या येऊ लागल्या. मग मला पोलीस संरक्षण घ्यावं लागलं.’ विवेक सध्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मस्ती 4’ सिनेमात दिसत आहे.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.