FDA च्या कारवाईला अजय देवगण याचे हायकोर्टात आव्हान, म्हणाला की मला नोटिस देणे चुकीचे !
महाराष्ट्र FDA ने ऑगस्ट 2026 अभिनेता अजय देवगण, तसेच शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांच्यावर विमल इलायचीच्या जाहीरात प्रकरणात कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पान मसाल्याची जाहिरात करणाऱ्या अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांना नोटीस बजावली होती. या नोटिसीला आता अभिनेता अजय देवगण याने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. अजय देवगण याने आपल्या याचिकेत महाराष्ट्र फूड एंड ड्रग एडमिनिस्ट्रेशन (FDA) च्या नियमांच्या संविधानिक वैधतेवरच प्रश्न चिन्ह केले आहे. अजय देवगण याने नेमके या आव्हान याचिकेत काय म्हटलंय हे पाहूयात….
बॉलीवूड अभिनेता अजय देवगण याने पान मसाल्याच्या जाहीरात केल्याच्या प्रकरणात महाराष्ट्र फूड एंड ड्रग एडमिनिस्ट्रेशन (FDA) कडून मिळालेल्या नोटीसीला मुंबई हायकोर्टात आव्हान दिले आहे. आपल्या याचिकेत त्याने एफडीएच्या नियमांच्या संविधानक वैधतेवर सवाल केले आहेत. अशा प्रकारे जाहीरातीत एक अभिनेता म्हणून काम केल्यानंतर थेट आपल्याला नोटीस देणे चुकीचे असल्याचे अजय देवगण यांनी म्हटले आहे. या प्रकरणात कारवाईची जबाबदारी अभिनेत्याची नसून जाहिरात देणाऱ्या कंपनी आणि उत्पादन करणाऱ्या कंपनीची असायला हवी असे याचिकेत म्हटले आहे.
अजय देवगण याच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाटी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात एफडीओ कमिश्नर तुकाराम मुंढे यांनी शुक्रवारी सांगितले की तपास पूर्ण झाला आहे. ज्यात स्पष्ट आहे की अजय देवगन, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांनी राज्याच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. आता हे प्रकरण पुढच्या आठवड्यात जॉईंट कमिश्नरकडे पाठवले जाईल. या प्रक्रिये अंतर्गत अधिकारी गैर – अपराधी प्रकरणात दीर्घ कोर्ट कारवाई शिवाय दंड आकारु शकतात.
महाराष्ट्र FDA ने ऑगस्ट 2026 अभिनेता अजय देवगण, तसेच शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांच्यावर विमल इलायचीच्या जाहीरात प्रकरणात कारणे दाखवा नोटीस बजावली होती. विमल इलायचीच्या नावाखाली दाखवलेल्या या जाहिरातीत वास्तविक विमल पान मसाल्याचे सरोगेट प्रमोशन केले जात असल्याचा एफडीएचा आरोप आहे.
एफडीएचे निर्देश काय ?
महाराष्ट्रात तंबाकू वा निकोटीन युक्त पान मसाला आणि गुटख्यावर बंदी आहे. अशात एफडीएचे म्हणणे आहे की इलायची जाहिरातीचा वापर करुन एक सारखे ब्रँड नेम, लोगो, प्रस्तूती आणि डायलॉग लोकांमध्ये विमल पान मसाल्याची ओळख दर्शवतात. यामुळे या प्रतिबंधित उत्पादनाची अप्रत्यक्ष जाहीरात होत आहे. तिन्ही अभिनेत्यांना जाहिराती मागची त्यांची भूमिका स्पष्ट करणे, एंडोर्समेंट कॉनट्रॅक्ट आणि आकारलेले पैसे या संदर्भातील माहिती देण्यास सांगण्यात आले आहे. ही जाहिरात हटवणे आणि पुढे अशा जाहीरातीत काम न करण्याचे निर्देशही एफडीएने दिले आहेत.
अजयच्या याचिकेनंतरही कारवाई सुरुच राहणार
या आधी विमल उत्पादनाची निर्माता कंपनी PB Agro ने ऑगस्टमध्ये दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेत महाराष्ट्र एफडीएच्या नोटीसीला रद्द करण्याची मागणी केली होती. दिल्ली हायकोर्टाने क्षेत्राधिकाराचा हवाला देत याचिका फेटाळली होती. कोर्टाने म्हटले होते की प्रकरण महाराष्ट्र एफडीएच्या कारवाईशी जोडलेले असल्याने याची सुनावणी देखली महाराष्ट्राच्या कोर्टात होणे संयुक्तिक आहे.यानंतर आता अभिनेता अजय देवगण यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याने आव्हान देऊनही एफडीएने सुरु केलेल्या कारवाईवर मात्र कोणतीही बंदी घालण्यात आलेली नाही.