AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : या लोकांशी कधीच मैत्री नको, चाणक्य काय सांगतात?

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटीनी तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये मैत्रीसंदर्भात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. मित्र कसे असावेत? मित्र कसे असू नये? मैत्री कोणासोबत करावी? कोणासोबत करू नये, अशा अनेक गोष्टी चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीतीमध्ये सांगितल्या आहेत.

Chanakya Niti : या लोकांशी कधीच मैत्री नको, चाणक्य काय सांगतात?
chanakya nitiImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 31, 2026 | 9:41 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील अनेकांना मार्गदर्शन करतात. चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये मैत्रीबद्दल देखील आपले मौलिक विचार मांडून ठेवले आहेत. मैत्री कोणासोबत करावी? मौत्री कोणासोबत करू नये? मित्र कसे असावेत? कसे असू नयेत? याबद्दल चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात एखाद्या व्यक्तीच्या जडणघडणीमध्ये तो कोणच्या संगतीमध्ये आहे? त्याने कोणासोबत मैत्री केली आहे? याचा देखील फार मोठा वाटा असतो, त्यामुळे माणसाने नेहमी विचारपूर्वकच एखाद्या व्यक्तीसोबत मैत्री केली पाहिजे, अन्यथा आयुष्यभर तुम्हाला पश्चातापाची वेळ येऊ शकते. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी चाणक्य नीतीमध्ये नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

स्वार्थी लोक – चाणक्य म्हणतात जे लोक स्वार्थी असतात, अशा लोकांसोबत तुम्ही कधीही मैत्री करू नका, कारण असे लोक जोपर्यंत त्यांचा स्वार्थ आहे, तोपर्यंत तुमच्याशी गोड बोलतील, मैत्रीचं नाटक करतील. परंतु एकदा त्यांचा हेतू साध्य झाला की असे लोक तुम्हाला शंभर टक्के धोका देणार, त्यामुळे माणसांनी नेहमी अशा लोकांपासून दूरच राहावं, असा सल्ला आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये दिला आहे.

पैशांसाठी लालची लोक – चाणक्य म्हणतात जे लोक पैशांसाठी लोभी असतात, ते पैसा मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. अशा लोकांपासून योग्य अंतर ठेवणंच हिताचं असतं, अशा लोकांसोबत कधीही मैत्री करू नका, अशा लोकांसोबत जर तुम्ही मैत्री केली तर तुम्ही एक दिवस मोठ्या संकटात सापडू शकतात. असे लोक त्यांच्या स्वार्थासाठी तुम्हाला देखील अडचणीत आणू शकतात, त्यामुळे अशा लोकांसोबत कधीही मैत्री करू नका.

व्यसनी लोक – चाणक्य म्हणतात जे लोक व्यसनी असतात, दारूच्या आहारी गेलेले असतात, अशा लोकांसोबत कधीही मैत्री करू नये, कारण त्यांच्यामुळे तुम्हाला देखील व्यसनाची सवय लागू शकते, त्यामुळे अशा लोकांपासून योग्य ते अंतर ठेवणं यातच तुमचं हित आहे, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही कसे बनले ‘सामना’चे संपादक? राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले...
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले, तुरुंगात पुस्तक लिहिलं अन्...
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट