‘माहेरची साडी’ चालवण्यासाठी अलका कुबल यांनी लढवलेली भन्नाट शक्कल; अजिंक्य देव यांचा मोठा खुलासा
Ajinkya Deo On Alka Kubal: माहेरची साडी हा चित्रपट खूपच गाजला. पण हा चित्रपट गाजण्यामागे अलका कुबलने काय प्रयत्न केले होते हे आता अभिनेता अजिंक्य देव यांनी बोलून दाखवलं.

Alka Kubal Maherchi Sadi: 1991 साली रिलीज झालेला ‘माहेरची साडी’ हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला. हा सिनेमा अजूनही मराठी प्रेक्षकवर्गाकडून तितक्यात कुतुहलाने पाहिला जातो. या सिनेमातील प्रत्येक कलाकारचे काम प्रेक्षकांना भावले होते. ‘माहेरची साडी’ या सिनेमात अलका कुबल, अजिंक्य देव, विक्रम गोखले, उषा नाडकर्णी, रमेश भाटकर यांसह दिग्गज कलाकारांनी काम केलं होतं. या सिनेमाला प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला. 1991 साली ‘माहेरची साडी’ हा सिनेमा प्रचंग गाजला चाहत्यांनी चित्रपट पाहण्यासाठी मोठी गर्दी केली. या चित्रपटाचे दिग्दर्शक विजय कोंडके यांनी केले असून, संगीत अनिल मोहिते यांनी दिले आहे.
अजिंक्य देव आणि अलका कुबल यासह या सिनेमातील कलाकारांना या चित्रपटामुळे एका रात्रीत प्रचंड प्रसिद्धी मिळाली. अजिंक्य देव यांनी अलिकडेच ‘the marathi founder’ ला मुलाखत दिलेली. या मुलाखतीत त्यांनी या चित्रपटाबद्दल अनेक किस्से शेअर केले. ‘माहेरची साडी’ या सिनेमात अजिंक्य देव यांनी ‘विक्की’ ही भूमिका साकारलेली. ‘माहेरची साडी’ या सिनेमाला मिळालेल्या यशामागे संपर्ण टिमसह अलका कुबल यांचा सर्वात मोठा वाटा आहे. हा चित्रपट ब्लॉकबस्टर व्हावा, यासाठी अलका कुबलने एक महत्त्वाचं काम केले होते.
अजिंक्य देव म्हणाले, ‘अलका कुबल ग्रासरूटची अभिनेत्री आहे. गावाकडे यात्रा होत असतात. या यात्रांमध्ये जाऊन ती आपले सिनेमा बघायला लोकांना सांगायची, ती यात्रांमध्ये स्वत: जायची, मोठमोठ्या यात्रा होत असे. तेव्हा खूप कॅशमध्येच धंदा व्हायचा. तेव्हा खूप चालायच्या यात्रा आणि त्यामुळे चित्रपट चालायचे प्रचंड, आणि ती खूप फेमस होती ना त्यावेळी, तिला गावाखेड्यांमध्ये खूप प्रसिद्धी मिळालेली’. आपण काम केलेल्या अभिनेत्रींबाबत अजिंक्य देव स्पष्टच म्हणाले, ‘मी काम केलेल्या सगळ्या अभिनेत्री चांगल्या होत्या. मला अर्चना जोगळेकर हिच्यासोबत काम करताना खूप चांगलं वाटलं. तो तिच्यासोबत माझा पहिलाच सिनेमा होता. वर्षा, अश्विनी बरोबर पण माझे दोन-तीन चित्रपट झाले आले होते’, असं अजिंक्य देव म्हणाले.