
Ajit Pawar plane crash: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकस्मित निधनाने संपूरर्ण राज्याला मोठा धक्का बसला आहे. तर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. 28 जानेवारी हा दिवस राज्यासाठी काळा दिवस ठरला. बुधवारी सकाळी राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाल्याची बातमी समोर आली. त्यानंतर विमान अपघातात अजित पवार गंभीर जखमी… अशी बातमी समोर आल्यानंतर अनेकांनी चिंता व्यक्त केली. पण काही क्षणात राज्याचं राजकारणाला मोठा धक्का बसणारी बातमी समोर आली आणि ती म्हणजे बारामती येथे सभेला जात असताना अजित पवार यांचं विमान अपघातात निधन… दादांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यात शोककळा पसरली.
बुधवारी अजित पवार यांचं निधन झालं आणि गुरुवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आजित दादा आज आपल्यात नाहीत… यावर विश्वास देखील बसणं कठीण आहे. अशात अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अजित पवार यांच्यासोबत व्यतीत केलेल्या काही आठवणी ताज्या केल्या आहे. अभिनेता आणि गायक राहूल वैद्य याने देखील एक व्हिडीओ पोस्ट केली आहे.
राहुल याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करत भावना व्यक्त केल्या आहे. ‘6 डिसेंबर 2025… तो खास क्षण… अजितदादा यांनी न थांबता एकामागून एक त्यांच्या आवडत्या गाण्यांची मागणी केली… मला कधीच वाटलं नव्हतं की, ही त्यांची शेवटची भेट असेल… त्यांचं असं अकाली जाणं मनाला चटका लावणारं आहे. अजितदादा तुम्ही फार लवकर गेलात…. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो… ओम शांती…’ असं राहुल याने कॅप्शन मध्ये लिहिलं आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पत्नी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार… अशी माहिती समोर येत आहे. शनिवारी दुपारनंतर सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार अशा चर्चांनी जोर धरला आहे. तर मध्यरात्री सुनेत्रा पवार आणि मुलगा पार्थ पवार मुंबईत दाखल झाले आहेत.
बुधवारी सकाळी जवळपास 8.30 वा. सुमारास अजित पवार यांच्या विमान अपघाताची माहिती समोर आली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानातून खर-खर आवाज येत होता आणि दोनवेळा विमानाने आकाशात फेरी मारली. यावेळी विमान तिरका झालेला आणि खाली पडल्यानंतर चार ते पाच स्फोट झाले. आता याप्रकरणी अधिक चौकशी सुरु आहे.