AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hanuman Ansh: आधी कोणी विचारलंही नाही, आता 400 कोटींच्या कमाईनंतर ‘हनुमान अंश 2’मध्ये सुपरस्टारची एण्ट्री? निर्मात्यांनी केला खुलासा

Hanuman Ansh 2: अवघ्या दोन कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या 'हनुमान अंश' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमालच केली. या चित्रपटाने तब्बल 400 कोटींचा टप्पा पार केला आहे. याच्या सीक्वेलमध्ये आता बड्या कलाकाराची वर्णी लागल्याची चर्चा आहे.

Hanuman Ansh: आधी कोणी विचारलंही नाही, आता 400 कोटींच्या कमाईनंतर ‘हनुमान अंश 2’मध्ये सुपरस्टारची एण्ट्री? निर्मात्यांनी केला खुलासा
शोभिनव सत्या (हनुमान अंश)Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 30, 2026 | 8:47 AM
Share

Hanuman Ansh: ‘हनुमान अंश’ या अध्यात्मिक चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मिळवलेल्या यशानंतर आता त्याच्या दुसऱ्या भागाची चर्चा सुरू झाली आहे. याचदरम्यान अभिनेता अक्षय कुमार ‘हनुमान अंश 2’मध्ये दिसणार असल्याच्या बातम्यांनी सोशल मीडियावर जोर धरला. मात्र, या चर्चांवर आता चित्रपटाच्या को-प्रोड्युसर अनुप्रिया नागर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. अक्षय कुमारच्या कास्टिंगबाबत त्यांनी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नसल्याचं स्पष्ट केलं आहे. एका मुलाखतीदरम्यान अनुप्रिया नागर यांना त्यांच्या आवडत्या अभिनेत्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी अक्षय कुमार यांचं नाव घेतलं. त्यानंतर त्यांना ‘हनुमान अंश’च्या दुसऱ्या भागात अक्षय कुमार दिसणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर अनुप्रिया यांनी ‘महाराजजी सांगतील’ अशा आशयाचं उत्तर दिलं.

याच उत्तराचा सोशल मीडियावर वेगळा अर्थ लावला गेला. अनुप्रिया यांनी अक्षय कुमारच्या कास्टिंगचे संकेत दिल्याची चर्चा सुरू झाली. पाहता पाहता ‘हनुमान अंश 2’मध्ये अक्षय कुमारची एंट्री होणार असल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या.

अनुप्रिया नागर यांनी काय सांगितलं?

या चर्चांवर अखेर अनुप्रिया नागर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की, ‘हनुमान अंश 2’मध्ये अक्षय कुमारच्या सहभागाबाबत त्यांनी काहीही सांगितलेलं नाही. त्यामुळे सध्या अक्षय कुमार चित्रपटात असणार असल्याच्या चर्चा केवळ अफवांवर आधारित आहेत.

‘हनुमान अंश’ची दमदार कामगिरी

‘हनुमान अंश’ हा चित्रपट आध्यात्मिक गुरु नीम करोली बाबा यांच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटात शोभिनव सत्य यांनी नीम करोली बाबांची भूमिका साकारली आहे, तर पूर्णिमा तिवारी यांनी त्यांच्या पत्नी रामबेटी यांची भूमिका केली आहे. विशाल चतुर्वेदी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. विशेष म्हणजे, अत्यंत कमी बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. चित्रपटाने जगभरात 400 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे ‘हनुमान अंश 2’कडूनही प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

सध्या मात्र सिक्वेलमध्ये अक्षय कुमार दिसणार असल्याची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे चाहत्यांना या कास्टिंगसाठी अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Follow Us
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
Sachin Waze : साडेपाच वर्षांनी सचिन वाझेला जामीन! अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
Thane | ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा