Alia Bhatt On Nepotism : इतरांच्या तुलनेत प्रवास माझ्यासाठी सोपा होता, हे मी मान्य करते, आलिया भट्टची कबुली

बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टला अनेकदा घराणेशाहीबद्दल प्रश्न विचारले जातात. आलिया या विषयावर अनेकदा बोलली आहे. यावेळी पुन्हा एकदा आलियाने घराणेशाहीवर भाष्य केले आहे.

Alia Bhatt On Nepotism : इतरांच्या तुलनेत प्रवास माझ्यासाठी सोपा होता, हे मी मान्य करते, आलिया भट्टची कबुली
Image Credit source: instagram
| Updated on: May 11, 2023 | 11:18 AM

मुंबई : बॉलिवूड मधील आघाडीची अभिनेत्री आलिया भट्टने (Alia Bhatt) आपल्या फिल्मी करिअरमध्ये आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. आलियाने आपल्या उत्कृष्ट कामगिरीने आपल्या प्रतिभेच्या जोरावर या इंडस्ट्रीत (bollywood) तिचं स्थान अबाधित असल्याचे सर्वांना दाखवून दिले आहे. आलियाचे नाव आता टॉप अभिनेत्रींच्या यादीत सामील झाले आहे. चित्रपट अभिनेते आणि विविध दिग्दर्शकांना त्याच्यासोबत काम करायला आवडते. आलिया ही अनेक दिग्दर्शकांची पहिली पसंती आहे.

दरम्यान, आलिया भट्टने घराणेशाही म्हणजेच नेपोटिझमवर सुरू असलेल्या वादावर तिची प्रतिक्रिया शेअर केली आहे. आलियाने नेपोटिझमचा स्वीकार केला आहे आणि पण मी माझे काम कधीच हलक्यात घेत नाही, असेही तिने नमूद केले आहे. आलिया गेल्या अनेक वर्षांपासून घराणेशाहीवर प्रश्न ऐकत आहे. या विषयावर तिला अनेकदा प्रश्न विचारले जातात. आलियाने नेपोटिझमवर उत्तर देण्याची ही पहिलीच वेळ नसली तरी ती पुन्हा एकदा या विषयावर बोलली आहे.

 

चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट आणि अभिनेत्री सोनी राझदान यांची मुलगी असलेल्या आलियाने एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, तिला पहिला चित्रपट तिच्या पालकांमुळे नाही तर करण जोहरच्या चित्रपटासाठी अधिकृतपणे ऑडिशन दिल्यानंतर मिळाला आहे. आलियाने करण जोहरच्या स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटातून पदार्पण केले होते. या चित्रपटातून वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांनाही लॉन्च करण्यात आले होते. आता आलियाने तिच्या नव्या मुलाखतीत या मुद्द्यावर चर्चा केली आहे.

 

नेपोटिझम आणि त्याच्या फायद्यांबद्दल आलिया म्हणते की, गेल्या काही वर्षांत याबद्दल खूप चर्चा झाली आहे. इतर लोकांपेक्षा हे(चित्रपटात काम तिंवा पदार्पण करणे) माझ्यासाठी सोपे होते, हे मला मान्य आहे. तिने तिच्या स्वप्नांची इतरांच्या स्वप्नांशी तुलना केली. कोणतेच स्वप्न मोठे किंवा लहान नसते यावर आलियाचा विश्वास आहे. अशा गोष्टी किंवा चर्चा कुठून येतात हेही मला समजते, असेही आलियाने नमूद केले.

 

आलियाच्या मते, (नेपोटिझममुळे) तिला (चांगली) सुरूवात करता आली, हे तिला मान्य आहे. तिच्याकडे काही खास शक्ती आहे, आणि म्हणूनच ती तिच्या कामासाठी 100% मेहनत करते. तिचं काम ती कधीही हलक्यात घेत नाही. तिची पावलं नेहमी जमिनीवरच असतात, असंही आलियाने सांगितले.