करीना कपूरच्या दिवाळी पार्टीत आलियाच्या साडी लूकने वेधलं सर्वांच लक्ष; करीनापेक्षाही दिसत होती सुंदर

करीना कपूरच्या दिवाळी पार्टीत आलिया भट्टचा लूक चर्चेचा विषय ठरला. तिने नेसलेली सोनेरी साडी आणि त्यावरील हटके ब्लाऊजमुळे अप्रतिम दिसत होती. पार्टीला अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते, पण आलियाने तिच्या हटके फॅशनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अनेकांच्या मते ती करीनापेक्षाही सुंदर दिसत होती.

करीना कपूरच्या दिवाळी पार्टीत आलियाच्या साडी लूकने वेधलं सर्वांच लक्ष; करीनापेक्षाही दिसत होती सुंदर
Alia Bhatt Steals Show at Kareena Diwali Party Stunning Saree Look
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 20, 2025 | 5:01 PM

सध्या बॉलिवूडमध्ये दिवाळी पार्टी सुरु आहे. अनेक सेलिब्रेटींच्या घरी दिवाळी पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे. नुकतीच बॉलिवूडमधील बेबो अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खान यांनी अलीकडेच त्यांच्या कुटुंबियांसाठी एक भव्य दिवाळी पार्टी आयोजित केली होती. आलिया भट्ट, करिश्मा कपूर, अमृता अरोरा, इब्राहिम अली खान, सोहा अली खान आणि नीतू कपूर यांच्यासह इतरांनी या पार्टीला हजेरी लावली होती.

अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खानच्या घरी दिवाळी पार्टीचे आयोजन 

पार्टीत सर्वाचा लूक हा नक्कीच सुंदर होता. सैफपासून ते करीना, करिश्मापर्यतं सर्वजण दिवाळी लूकमध्ये छानच दिसत होते.पार्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. करीनाने धनत्रयोदशीला दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते, जिथे खान आणि कपूर कुटुंब एकत्र दिसले.करीनाने तिच्या कुटुंबासाठी एक पार्टी आयोजित केली होती. या फोटोमध्ये ती तिची बहीण करिश्मा कपूर, भाऊ आधार जैन आणि त्याची पत्नीसोबत दिसत आहे. दरम्यान इब्राहिमने देखील पार्टीत हजेरी लावली होती.


कपूर अन् खान कुटुंबाने एकत्र येत सेलिब्रेट केली दिवाळी 

सैफ त्याची बहीण सोहा, मेहुणा कुणाल खेमू, तसेच करीना -करिश्माची मैत्रीण तथा अभिनेत्री अमृताने देखील हजेरी लावली होती.अमृता आणि सोहाने कपूर बहिणींसोबत पोज दिली. तसेच करीनाच्या पार्टीत कपूर कुटुंबीय नीतू कपूर, करण कपूर, आधार जैन आणि आलिया भट्ट हे देखील उपस्थित होते.आलिया भट्टने देखील करीनासोबत आणि संपूर्ण कुटुंबासोबत फोटो काढले. ज्यात ती फारच सुंदर दिसत आहे. मुख्य म्हणजे आलिया भट्टने नेसलेल्या साडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

आलियाच्या साडीने आणि लूकने सर्वांचे लक्ष वेधलं

आलियाने सोनेरी साडी नेसली होती पण त्यावर त्याच साडीला मॅचिंग असलेला ब्लाऊज तिने घातला होता. पण तो एखाद्या श्रगसारखा म्हणजे जॅकेटसारखा दिसत होता. त्यामुळे तिची साडी फारच हटके दिसत होती. त्यावर तिने मांग टिक्का लावून तिला लूक पूर्ण केला होता. आलिया या लूक मध्ये फारच सुंगर दिसत होती. आलियाने करिनासोबतचा एक फोटोही शेअर केला. तसेही आलियाला करीना किती आवडते हे सर्वांना माहित आहे. त्यामुळे चाहत्यांना इंडस्ट्रीतील दोन लोकप्रिय अभिनेत्रींना एकत्र पाहून खूप आनंद झाला.