AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘धुरंधर 2’च्या लाटेला घाबरले; इतक्या चित्रपटांनी घेतला मोठा निर्णय

'धुरंधर : द रिव्हेंज' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईची इतकी मोठी लाट आणली आहे की त्यापुढे कोणाचाच निभाव लागणं कठीण दिसत आहे. म्हणून रणवीर सिंहच्या या चित्रपटाच्या त्सुनामील घाबरून अनेक चित्रपटांच्या निर्मात्यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

'धुरंधर 2'च्या लाटेला घाबरले; इतक्या चित्रपटांनी घेतला मोठा निर्णय
रणवीर सिंहImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 02, 2026 | 10:35 PM
Share

आदित्य घर दिग्दर्शित ‘धुरंधर 2’ हा चित्रपट 19 मार्च 2026 रोजी जगभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एक असं तुफान आणलं, ज्याच्यासमोर कोणताच चित्रपट टिकू शकत नाहीये. तीन महिन्यांपासून रणवीर सिंहच्या या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने प्रतीक्षा करत होते. 5 डिसेंबर 2025 रोजी ‘धुरंधर’ हा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर जेव्हा ‘धुरंदर 2’ची घोषणा झाली, तेव्हा इतर सर्व निर्मात्यांनी एक पाऊल मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. हीच गोष्ट अद्यापही पाहायला मिळत आहे. एप्रिलमध्ये प्रदर्शित होणारे अनेक मोठे चित्रपट मे किंवा जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत.

अक्षय कुमार, सलमान खान यांचे चित्रपट

अक्षय कुमारचा ‘भूत बंगला’ हा चित्रपट मार्च महिन्यात प्रदर्शित होणार होता. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. हा हॉरर कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांनी आरामात पहावा आणि इतर कोणत्याही चित्रपटांशी त्याने संघर्ष टाळावा, अशी निर्मात्यांची इच्छा आहे. त्यामुळे या चित्रपटाचे पेड प्रीव्हू आता 16 एप्रिलपासून सुरू होणार आहेत. तर सलमान खानचा ‘मातृभूमी’ हा चित्रपट 17 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र ‘बॉलिवूड हंगामा’ने दिलेल्या एका वृत्तानुसार आता हा चित्रपट 15 मे रोजी प्रदर्शित होऊ शकतो. यामागचं आणखी एक कारण म्हणजे या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारलेले अभिनेते प्रशांत यांच्या निधनामुळे काही चित्रीकरण अपूर्ण राहिलं आहे. म्हणून त्याचं प्रदर्शन पुढे ढकललं जात आहे.

साऊथ सुपरस्टार्सचीही माघार

‘भूत बंगला’ आणि ‘मातृभूमी’ याशिवाय साऊथ सुपरस्टार मोहनलाल आणि ममूटी यांचा ‘पेट्रियॉट’ हा चित्रपट 23 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता. या चित्रपटाचीही तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. आता हा चित्रपट 1 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. याविषयीची माहिती अभिनेते ममूटी यांनी स्वतः सोशल मीडियाद्वारे दिली. याशिवाय ‘दृश्यम 3’ आणि ‘पेड्डी’ यांसारख्या चित्रपटांच्याही प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

या सर्वांत आणखी एका मोठ्या चित्रपटाने प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्या निर्णय घेतला होता. ‘केजीएफ’ फेम यशची मुख्य भूमिका असलेला ‘टॉक्सिक’ हा चित्रपट ‘धुरंदर 2’ सोबतच 19 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता. या दोन चित्रपटांमध्ये मोठी बॉक्स ऑफिस टक्कर होण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण इराण- इस्रायल युद्धाचं कारण देत टॉक्सिक या चित्रपटाचं प्रदर्शन अखेरीस पुढे ढकलण्यात आलं होतं. आता हा चित्रपट 4 जून 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...