AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘धुरंधर 2’मध्ये फक्त 1 सेकंदाची भूमिका, तरीही तिची चर्चा; तुम्ही पाहिलंत का?

Dhurandhar 2: आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर : द रिव्हेंज' या चित्रपटात अवघ्या एका सेकंदासाठी स्क्रीनवर झळकलेल्या या तरुणीची आता सोशल मीडियावर चर्चा होऊ लागली आहे. ही तरुणी आहे तरी कोण, जाणून घ्या..

'धुरंधर 2'मध्ये फक्त 1 सेकंदाची भूमिका, तरीही तिची चर्चा; तुम्ही पाहिलंत का?
Niyati Parikh and Ranveer SinghImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 02, 2026 | 9:43 AM
Share

बॉलिवूडचा ‘पॉवरहाऊस’ म्हणून रणवीर सिंहचा ‘धुरंधर : द रिव्हेंज’ हा चित्रपट सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. कमाईच्या बाबतीत या चित्रपटाने इतके नवे विक्रम रचले आहेत, की इतर सर्व चित्रपट त्याच्यापुढे फिके पडले आहेत. थिएटरपासून सोशल मीडियापर्यंत सर्वत्र त्याचीच क्रेझ पहायला मिळतेय. या चित्रपटातील छोट्यातला छोटा सीन आणि छोट्यातली छोटी भूमिकासुद्धा प्रेक्षकांच्या नजरेतून सुटली नाही. म्हणूनच सहाय्यक अभिनेता किंवा अभिनेत्रीच्या भूमिकेतील कलाकारांनाही सोशल मीडियावर तेवढंच प्रेम मिळतंय. कमालीची बाब म्हणजे आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटात अवघ्या एका सेकंदासाठी झळकलेली एक अभिनेत्री रातोरात सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. नेटकऱ्यांमध्ये या मिस्ट्री गर्लबद्दल प्रचंड कुतूहल पहायला मिळतंय.

एक सेकंदाची भूमिका व्हायरल

जर तुम्ही ‘धुरंधर 2’ हा चित्रपट पाहिला असेल तर तुम्हाला या चित्रपटातील हाय-व्होल्टेज क्लायमॅक्स सीन नक्कीच लक्षात असेल. या सीनमध्ये रणवीर सिंहची भूमिका गंभीर जखमी झालेली असते आणि भारतात परतण्यासाठी तो चार्टर्ड विमानाच्या दिशेने जाऊ लागतो. ज्याक्षणी तो विमानात प्रवेश करतो, त्यावेळी एक एअर हॉस्टेस स्क्रीनवर दिसते. मोठ्या पडद्यावर हा सीन इतक्या जलद गतीने पुढे सरकतो की ती एअर हॉस्टेस कोण होती, याकडे फार क्वचितच कोणाचं लक्ष गेलं असेल. कारण चित्रपटात तिचा चेहरा पूर्ण स्पष्ट दिसून येत नाही. परंतु आता तोच एक सेकंदाचा फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कोण आहे ती व्हायरल होणार अभिनेत्री?

ज्या अभिनेत्रीने ही भूमिका साकारली आहे, तिचं नाव नियती पारीख असं आहे. नियतीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर हा छोटा पण तिच्यासाठी तितकाच खास असलेल्या सीनची क्लिप शेअर केली आहे. त्यानंतर ती चर्चेत आली आहे. ‘धुरंधर 2 मध्ये मला कोणी कोणी पाहिलं’, असा सवाल करत तिने ही क्लिप पोस्ट केली आहे. नियतीच हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

नियतीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून समजतंय की ती इन्फ्लुएन्सर आणि अभिनेत्री आहे. इन्स्टाग्रामवर तिचे फक्त 2500 फॉलोअर्स आहेत. तिने धुरंधरमधल्या अनेक कलाकारांसोबतचे फोटोसुद्धा शेअर केले आहेत. राकेश बेदी, सारा अर्जुन यांच्यासोबत तिने फोटो पोस्ट केले आहेत.

Follow Us
माझा भाऊ गेला, आता सत्ता हे लोक उपभोगत आहेत! सुप्रिया सुळे संतापल्या
Supriya Sule on Ajit Pawar Accident | माझा भाऊ गेला, आता सत्ता हे लोक उपभोगत आहेत! सुप्रिया सुळे संतापल्या; अजित पवारांच्या अपघातावरून घणाघात
जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ मराठा समाजाचा एल्गार! परळी बंद
Maratha Reservation | जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ मराठा समाजाचा एल्गार! परळी बंद, हिंगोली-नांदेडमध्ये रास्ता रोको
मुंबईत RSS-BJPची मोठी समन्वय बैठक! फडणवीसांसह मंत्री उपस्थित
Mumbai RSS BJP | मुंबईत RSS-BJPची मोठी समन्वय बैठक! फडणवीसांसह मंत्री उपस्थित; राजकीय-सामाजिक मुद्द्यांवर मंथन
धनगर समाजाचा 7 सप्टेंबरला राज्यव्यापी एल्गार! ST आरक्षणाच्या मागणीसाठी
Gopichand Padalkar | धनगर समाजाचा 7 सप्टेंबरला राज्यव्यापी एल्गार! ST आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्रभर आंदोलनाची हाक
चेंबूरमधील गुड लक आणि अशफाक बेकरीचा FSSAI परवाना निलंबित
Mumbai FDA : चेंबूरमधील गुड लक आणि अशफाक बेकरीचा FSSAI परवाना निलंबित; स्वच्छता निकषांचे उल्लंघन
सुप्रीम कोर्टात शिंदेंच्या शिवसेनेच्या युक्तिवादाचे 29 मुद्दे, 28...
Shivsena Hearing : सुप्रीम कोर्टात शिंदेंच्या शिवसेनेच्या युक्तिवादाचे 29 मुद्दे, 28 वा मुद्दा सर्वात खास
जरांगे नावाची सिरीज, प्रोड्युसर शिंदे, हिरो मनोज जरांगे आणि...
जरांगे नावाची सिरीज, प्रोड्युसर शिंदे, हिरो मनोज जरांगे आणि... गुणरत्न सदावर्तेंची पत्रकार परिषद ऐकाच!
माझ्या भावाच्या अपघातावर एफआयआर नाही मात्र अमित ठाकरेंवर...
माझ्या भावाच्या अपघातावर एफआयआर नाही मात्र अमित ठाकरेंवर... सत्ताधारी पक्षाच्या भूमिकेवर सुळे संतापल्या
मराठा आरक्षणाचं प्रकरण निर्णायक वळणावर? प्रसाद लाड जरांगेंची भेट घेणार
मराठा आरक्षणाचं प्रकरण निर्णायक वळणावर? प्रसाद लाड जरांगेंची भेट घेणार अन्...
हातावर बड्या नेत्याचं नाव लिहून जीवन संपवणाऱ्या डॉक्टर प्रकरणी मोठा...
हातावर बड्या नेत्याचं नाव लिहून जीवन संपवणाऱ्या डॉक्टर प्रकरणी मोठा खुलासा; कुटुंबाकडून हादरवणारी माहिती समोर