
सामान्यांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत सर्वांनी करवा चौथचा उपवास केला
देशभरात काल ( 10 ऑक्टोबर 2025) करवा चौथ हा सण साजरा केला गेला. या व्रतादरम्यान प्रत्येक महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. सामान्यांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत सर्वांनी करवा चौथचा उपवास केला, व्रत केलं होतं. अनेक सेलिब्रिटींनी याबाबतच्या पोस्टही शेअर केल्या होत्या. गोविंदाची पत्नी सुनिताने देखील गोविंदासाठी करवा चौथचे व्रत पकडले होते. एवढंच नाही तर गोविंदाने देखील तिला करवा चौथचे एक खास अन् महागडं गिफ्ट दिलं आहे.
सुनीताला गोविंदाला दिलं हे खास गिफ्ट
सुनिताने तिच्या पतीकडून मिळालेल्या एका महागड्या भेटवस्तूची झलक शेअर केली आहे. तसेच तिने ‘माझा हिरो नंबर वन ‘ असं कॅप्शनही या पोस्टला दिलं आहे. सुनीताच्या पोस्टवर चाहते अनेक प्रतिक्रिया देत आहेत. सुनीता आहुजाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर दोन सुंदर फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये ती गडद हिरव्या रंगाचा सूट परिधान केलेली दिसतेय. या ड्रेसमध्ये ती फारच आकर्षक आणि आनंदी दिसत आहे. या फोटोमध्ये तिने एक लांब सोन्याचा नेकलेस घातलेला दिसच आहे. जो की तिच्यावर फारच उठून दिसत आहे. हा तोच नेकलेस आहे जो गोविंदाने तिला करवा चौथला खास गिफ्ट म्हणून दिला आहे.
“गोविंदा, हिरो नंबर 1”
सुनीता आहुजा सोन्याचा नेकलेस मिळाल्याने खूप आनंदी दिसत होती. तिने याचा फोटो पोस्ट करत गोविंदाचे कौतुकही केले आहे. तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे,
“सोना कितना सोना है,माझी करवा चौथचे गिफ्ट आलं आहे. गोविंदा, हिरो नंबर 1” असं तिने लिहिलं आहे. सुनीताचे फोटो पाहून चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तसेच या जोडीला “सदाबहार” म्हटलं आहे. एका चाहत्याने लिहिले, “गोविंदाची भेट आणि तुमची शैली, दोन्हीही अद्भूत आहेत!” दुसऱ्याने म्हटले, “करवा चौथचा खरा हिरो गोविंदा आहे.”
गोविंदा आणि सुनीता आहुजा यांच्या घटस्फोटाच्या अफवा
काही महिन्यांपूर्वी गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता यांच्या घटस्फोटाच्या अफवा पसरल्या होत्या. तथापि, अभिनेत्याचे वकील ललित बिंदल यांनी सांगितले की असे काहीही खरे नाही आणि लोक फक्त जुन्या गोष्टींबद्दल बोलत आहेत. यापूर्वी, गोविंदाचे व्यवस्थापक शशी यांनी या अफवा फेटाळून लावल्या होत्या.
गोविंदा आणि सुनीता आहुजा यांनी सोडवला प्रश्न
शशी म्हणाले होते, “ही जुनी गोष्ट आहे जी ताजी बातमी म्हणून पसरवली जात आहे. काहीही नवीन घडलेले नाही. मला सतत फोन येत आहेत, पण सर्व काही ठीक आहे. या जोडप्यामध्ये जवळजवळ सर्व काही मिटले आहे. काळजी करण्यासारखे काही नाही.” सुनीता आहुजाने काही महिन्यांपूर्वी स्वतःचे यूट्यूब चॅनेल देखील लाँच केले होते, जिथे ती चाहत्यांसोबत तिची दैनंदिन दिनचर्या शेअर करते. सुनीताचा पहिला व्हीलॉग, ज्यामध्ये तिने तिच्या कुटुंबाची देवता, माँ कालीचे दर्शन घेतले होते, तो व्हीलॉग सुपरहिट झाला.