Boycott Maldives | ‘आमच्या आत्मनिर्भरतेला ठेच…’, मालदीव – लक्षद्वीप वादावर अमिताभ बच्चन यांची मोठी प्रतिक्रिया…

Lakshadweep Vs Maldives : ‘बॉयकॉट मालदीव’ पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात टिप्पणी... महानायक अमिताभ बच्चन यांचं मोठं वक्तव्य..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अमिताभ बच्चन यांच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा सुरु आहे...

Boycott Maldives | आमच्या आत्मनिर्भरतेला ठेच..., मालदीव - लक्षद्वीप वादावर अमिताभ बच्चन यांची मोठी प्रतिक्रिया...
| Updated on: Jan 08, 2024 | 6:38 PM

मुंबई | 8 जानेवारी 2024 : मालदीव आणि लक्षद्वीप यांच्यातील वाद आता टोकाला पोहोचला आहे. मालदीव सरकारमधील तीन मंत्र्यांनी सोशल मिडीयावर भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात टिप्पणी केल्यानंतर सोशल मीडियावर ‘बॉयकॉट मालदीव’ असा हॅशटॅग ट्रेंन्ड करत आहे. मालदीव सरकारमधील मंत्र्यांच्या टिप्पणीवर प्रसिद्ध सेलिब्रिटींनी संताप व्यक्त केला आहे. महानायक अमिताभ बच्चन यांनी ट्विट देखील केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी भारतातील विविध समुद्रकिनाऱ्यांची फोटो शेअर केली आणि संकटात संधी… असं म्हटलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अमिकाभ बच्चन यांच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा रंगली आहे.

अमिताभ बच्चन यांनी वीरेंद्र सेहवाग यांच्या मताशी सहमती दर्शवली आणि म्हणाले, ‘वीरु पाजी… तुम्ही मांडलेलं मत बरोबर आहे आणि आपल्या भूमीच्या बाजूने आहे. आपल्या स्वतःच्या गोष्टी सर्वोत्तम आहेत.. मी लक्षद्वीप आणि अंदमानला गेलो आहे. ती अप्रतिम सुंदर ठिकाणे आहेत. अंडरवाटर येणारा अनुभव अविश्वसनीय आहे.’

पुढे बिग बी म्हणाले, ‘आपण भारत आहोत… आम्ही आत्मनिर्भर आहोत… आमच्या आत्मनिर्भरतेला ठेच पोहोचवू नका… जय हिंद…|’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अमिताभ बच्चन यांच्या देखील सोशल मीडियापोस्टची चर्चा रंगली आहे. बिग बी यांच्या एक्सवर (ट्विट) नेटकरी देखील लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

 

 

माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग याची सोशल मीडियावर पोस्ट देखील सर्वत्र व्हायरल होत आहे. ‘उडुपीचे सुंदर समुद्रकिनारे असोत किंवा पाँडीमधील पॅराडाईज बीच, अंदमानमधील नाईल आणि हॅवलॉक आणि आपल्या देशभरातील इतर अनेक सुंदर समुद्रकिनारे असोत, भारतातील अनेक अनपेक्षित ठिकाणे आहेत ज्यात काही पायाभूत सुविधांसह बरीच सुधारणा केली जाऊ शकते.’ असं माजी क्रिकेटपटू म्हणाला…

दरम्यान, भारतातील अनेक सेलिब्रिटींनीही मालदीववर केलेल्या कमेंटवर ट्विट करायला सुरुवात केली. सोशल मीडियावर सर्वत्र ‘बॉयकॉट मालदीव’ असा हॅशटॅग ट्रेंन्ड करत आहे. शिवाय अनेक सेलिब्रिटींनी मालदीवच्या ट्रिप देखील रद्द केल्या आहेत. एवढंच नाही तर, तिकिट रद्द केल्याचे स्क्रिनशॉट देखील सेलिब्रिटी सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत.