AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

45 वर्षांपूर्वीचं हे गाणं वाजल्याशिवाय पूर्ण होत नाही होळी, वाजताच आपोआप पाय हलतात, ऐकून तुम्ही देखील…

किती गाणी आली आणि गेली पण होळीच्या दिवशी हे गाणं वाजलं की लोकांचे पाय शेवटपर्यंत थांबत नाहीत. काळ बदलला, गाणी बदलली, पण या एका गाण्याची जादू मात्र अजूनही कायम आहे.

45 वर्षांपूर्वीचं हे गाणं वाजल्याशिवाय पूर्ण होत नाही होळी, वाजताच आपोआप पाय हलतात, ऐकून तुम्ही देखील...
Image Credit source: Social media
| Updated on: Mar 01, 2026 | 9:25 AM
Share

Holi Song: होळी म्हणजे रंगांचा, उत्साहाचा आणि जल्लोषाचा सण. देशभरात 4 मार्च रोजी होळी साजरी केली जाणार असून दरवर्षीप्रमाणे यंदाही नागरिकांना या सणाची उत्सुकता लागून राहिली आहे. रंग, गुलाल, पिचकारी आणि गोडधोड पदार्थ यांशिवाय होळी पूर्ण होत नाही; मात्र आणखी एक गोष्ट आहे ज्याशिवाय हा सण अपूर्ण वाटतो ती म्हणजे होळीची गाणी.

दरवर्षी हिंदी आणि भोजपुरी चित्रपटसृष्टीत होळीवर आधारित अनेक नवी गाणी प्रदर्शित होतात. तरीही एक जुने गाणे असे आहे जे प्रत्येक वेळी नव्या गाण्यांवर मात करताना दिसते. ते गाणे म्हणजे ‘रंग बरसे भीगे चुनर वाली’. हे गाणे लागले की होळीच्या कार्यक्रमात आपोआपच रंगत वाढते.

लोकप्रिय होळी गीत

14 ऑगस्ट 1981 रोजी प्रदर्शित झालेल्या ‘सिलसिला’ या चित्रपटातील हे गाणे आजही सर्वाधिक लोकप्रिय होळी गीत मानले जाते. तब्बल 45 वर्षांनंतरही होळी पार्टीत ‘रंग बरसे’ वाजले की नाचणाऱ्यांचे पाय थांबत नाहीत. या गाण्याशी संबंधित काही रंजक गोष्टीदेखील आहेत. हे गाणं सुप्रसिद्ध कवी हरिवंशराय बच्चन यांनी लिहिले होते तर या गाण्याला आवाज स्वतः अमिताभ बच्चन यांनी दिला होता. त्यामुळे या गाण्याला एक वेगळीच ओळख मिळाली.

हे गाणे अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. विशेष म्हणजे, या चित्रपटानंतर अमिताभ आणि रेखा यांनी एकत्र काम केले नाही. त्यामुळे ‘सिलसिला’ हा त्यांचा शेवटचा एकत्रित चित्रपट ठरला. या गाण्यात अमिताभ आणि रेखा यांच्यासोबत जया बच्चन आणि संजीव कुमार हेही कलाकार झळकले होते.

बॉक्स ऑफिसवर अपयश

जरी ‘रंग बरसे’ हे गाणं आजही सुपरहिट मानले जात असले तरी चित्रपट मात्र बॉक्स ऑफिसवर अपेक्षेप्रमाणे यशस्वी ठरला नाही. भारतात हा चित्रपट अपयशी ठरला. मात्र त्यातील गाणी प्रचंड लोकप्रिय झाली. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती यश चोप्रा यांनी केली होती. त्या काळात रेखा आणि जया बच्चन यांना एकत्र काम करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते. तरीदेखील भारतीय प्रेक्षकांनी चित्रपटाला अपेक्षित प्रतिसाद दिला नाही. मात्र इंग्लंड आणि अमेरिकेतील हिंदी चित्रपटप्रेमींनी ‘सिलसिला’ला मोठी पसंती दिली होती.

आजही होळीच्या सणात ‘रंग बरसे’ हे गाणे लागले की वातावरण रंगतदार होते आणि सणाचा आनंद द्विगुणित होतो. काळ बदलला, गाणी बदलली, पण या एका गाण्याची जादू मात्र अजूनही कायम आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...